मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात धान्य व भुसार मालाची लिलाव प्रक्रिया होत असते. मुंगसे व झोडगे कांदा खरेदी विक्री केंद्रावर कांद्याची लिलाव प्रक्रिया पार पडत असते. प्रतिदिन सुमारे ९० लाखांची उलाढाल होत असते; मात्र गेल्या ६ दिवसांपासून बाजार समितीतील लिलाव प्रक्रिया बंद आहे. परिणामी ६ दिवसातील ५ कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. याचा फटका हमाल, मापारी यांच्या कामकाजावर झाला आहे. तसेच बाजार समिती आवारात असलेल्या शेती संबंधी अवजारे, बी - बियाणे, रासायनिक खते, औषधे खरेदी - विक्रीवरही परिणाम झाला आहे. शेतीमाल बाजार पेठेपर्यंत आणणाऱ्या वाहनधारकांना याचा आर्थिक फटका बसला आहे. बाजार समितीच बंद असल्यामुळे भाडे तत्वावर चालणारी वाहने गेल्या ६ दिवसांपासून उभी आहेत. तसेच नाशवंत माल खराब होत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. बाजार समितीलाही दररोज ७० हजार रूपये बाजार शुल्क मिळत होता; मात्र व्यवहार बंद असल्यामुळे बाजार शुल्क वसूल केले जात नाही. गेल्या ६ दिवसात ५ लाख ४० हजार रूपयांचे नुकसान बाजार समितीचे झाले आहे.
कोट...
शासनाने शेती माल खरेदी केल्यानंतर रोखीने पैसे अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र गेल्या ६ दिवसांपासून मार्च एण्डमुळे बँकांचे कामकाज बंद आहे. बाजार समितीत दररोज कांदा लिलावातून ७० ते ८० लाखांची उलाढाल होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २४ तासाच्या आत धनादेश देणे बंधनकारक आहे; मात्र बँक बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांना रोखीने पैसे व धनादेश देणे शक्य नाही. या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी यासाठी लिलाव प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- सुनील देवरे, उपसभापती, कृउबा मालेगाव
फोटो फाईल नेम : ०१ एमएमएवाय ०२ . जेपीजी - सुनील देवरे
कोट...
बाजार समितीतील लिलाव प्रक्रिया बंद असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मोठ्या कष्टाने पिकविलेला शेती माल विक्रीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोरोनाचे मोठे संकट असताना शेतकरी शेतीमाल पिकवत आहे मात्र, शेती मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या ७ दिवसांपासून कांद्यासह इतर लिलाव प्रक्रिया बंद आहे. मार्केट सुरू होताच शेतकरी गर्दी करतील. याचा फायदा व्यापाऱ्यांना होऊन कांदा कवडीमोल दराने खरेदी करण्याचा प्रकार होईल. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
- चंद्रकांत शेवाळे, कांदा उत्पादक शेतकरी, टेहरे
फोटो फाईल नेम : ०१ एमएमएवाय ०१ जेपीजी - चंद्रकांत शेवाळे
===Photopath===
010421\01nsk_1_01042021_13.jpg~010421\01nsk_2_01042021_13.jpg
===Caption===
फोटो फाईल नेम : ०१ एमएमएवाय ०२ . जेपीजी - सुनील देवरेफोटो फाईल नेम : ०१ एमएमएवाय ०१ . जेपीजी - चंद्रकांत शेवाळे~फोटो फाईल नेम : ०१ एमएमएवाय ०२ . जेपीजी - सुनील देवरेफोटो फाईल नेम : ०१ एमएमएवाय ०१ . जेपीजी - चंद्रकांत शेवाळे