मालेगाव कॅम्प : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया सणासाठी मालेगावी खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली आहे. पूजेसाठी लागणारे साहित्य व फळांच्या दुकानावर मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे या वस्तूंच्या दरांवर परिणाम झाला आहे तर फळांचा राजा आंब्याचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून अक्षय्य तृतीयेची (आखाजी) लगबग महिलावर्गामध्ये सुरू आहे. यासाठी लागणारे घागर मडकी, आंबे, खरबूज व इतर पूजेचे साहित्याचे तात्पूर्ती दुकाने गूळ बाजार, रामसेतू, संगमेश्वर, रावळगाव नाका, सटाणा नाका, सोयगावसह इतरत्र लागली आहेत. या दुकानांवर दोन दिवसांपासून महिलावर्गाचा खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. हिंदू धर्मीयांमध्ये अक्षय्य तृतीयेला मोठे महत्त्व आहे व उद्या अक्षय्य तृतीयासह परशुराम जयंतीदेखील शहरातून साजरी केली जाणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शहरात विविध नवीन गृहोपयोगी वस्तू, वाहने, सोने-चांदी खरेदीसाठी गर्दी होत आहे. मातीची घागर, लहान मडके यांची विक्री शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत होत आहे, तर आंब्याचा भाव गगनाला भिडला आहे. बदाम, लालबाग आंबा, शंभर ते एकशे चाळीस रुपये त्या खालोखाल पायरी, लंगडा आदी प्रकारचे आंबे सत्तर ते शंभर रुपये दराने विक्री होत आहेत, तर खरबूज, टरबूजची विक्री प्रतवारप्रमाणे व आकारावर ठरवले जात आहे. खरबूज २० ते ३० रुपये, टरबूज त्याच दराप्रमाणे बाजारात उपलब्ध झाले आहेत.
अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी गर्दी मालेगाव : खरबूज, आंब्याचे भाव वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:09 AM
मालेगाव कॅम्प : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया सणासाठी मालेगावी खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली आहे.
ठळक मुद्देफळांचा राजा आंब्याचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला दोन दिवसांपासून महिलावर्गाचा खरेदीसाठी गर्दी