गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर दररोज वाढत आहेत. इंधनाने शंभरी पार केली आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. इंधन दरवाढीमुळे बाजारपेठेतील सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक आधीच आर्थिक संकटात असताना केंद्र शासनाने केलेली दरवाढ ही अन्यायकारक आहे. दरवाढ व महागाईच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. १८) एमआयएमचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख व मनपाचे नगरसेवक डॉ. खालीद परवेझ यांच्या नेतृत्त्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालय आवारात धरणे आंदोलन करून शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रांत अधिकारी शर्मा यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात नगरसेवक माजीद युनूस इसा, अयाज हलचल, लईक हाजी, रशीद अय्युब, जमाल नाशीर, अमीन फलई, गाजी अमानुल्ला, फारूख शेख, अरबाज खान आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो- १८ मालेगाव आंदोलन
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करताना एमआयएमचे नगरसेवक डॉ. खालीद परवेझ, नगरसेवक माजीद युनूस इसा, अयाज हलचल, लईक हाजी, रशीद अय्युब, जमाल नाशीर, अमीन फलई, गाजी अमानुल्ला, फारूख शेख, अरबाज खान आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते.
===Photopath===
180621\18nsk_36_18062021_13.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.