मालेगाव : म्यानमारचा रहिवासी असलेला संशयित इक्बालच्या तथाकथित भेटीमुळे मालेगाव मध्यचे आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल चर्चेत आले असून केंद्रीय गृह विभागाने त्यांची चौकशी लावल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. तर मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी ही बाब गोपनीय असून त्याबाबत अधिक भाष्य करण्याचे टाळले.इक्बाल हा संशयित असून तो ७ डिसेंबर २०१८ रोजी मालेगावी आला होता. त्याच्या देशातील वास्तव्याची चौकशी करण्याची मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी केली होती. त्याची दखल घेत केंद्रीय गृह विभागाने त्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू केल्याची चर्चा आहे. या संदर्भात आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ७ डिसेंबर २०१८ ला इक्बाल मालेगावात विवाह सोहळ्यास हजर राहण्यासाठी आला होता. लग्नात ते माझ्या संपर्कात आले. त्यांना मी बोलावले नव्हते. ते माझे पाहुणे नव्हते. त्यांची माझ्याशी भेट झाली इतकेच. त्यानंतर वर्षभराने निवडणुकीत पराभूत झालेल्या आसीफ शेख यांनी माझ्या विरोधात तक्रार दिली. लग्नात माझे फोटो नाहीत. फोटो एडिट करुन लावले आहेत. लग्नात आसीफ शेख यांचेबरोबर देखील इक्बालचे फोटो आहेत. माझ्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आरोपांचा खुलासा मी पोलिसांना भेटून करणार आहे. दरम्यान, माजी आमदार आसीफ शेख यांचेशी मात्र संपर्क होऊ शकला नाही.
म्यानमारच्या इक्बालच्या भेटीमुळे मालेगावचे आमदार चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2021 12:03 AM
मालेगाव : म्यानमारचा रहिवासी असलेला संशयित इक्बालच्या तथाकथित भेटीमुळे मालेगाव मध्यचे आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल चर्चेत आले असून केंद्रीय गृह विभागाने त्यांची चौकशी लावल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. तर मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी ही बाब गोपनीय असून त्याबाबत अधिक भाष्य करण्याचे टाळले.
ठळक मुद्देइक्बाल हा संशयित असून तो ७ डिसेंबर २०१८ रोजी मालेगावी आला होता.