नाशिक येथील रॉयल हार्टड रायडर ग्रुप यांनी नाशिक येथून बाइक रॅली आयोजित केली होती. ३५ बुलेट चालकांचे कृषी विद्यालय सौंदाणे येथे स्वागत करण्यात आले. संस्थेच्या वतीने गिरणापूल, मोतीबागनाका, मोसमपूल व एकात्मता चौकात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री दादा भुसे होते. या वेळी भुसे म्हणाले की, अपघाताचे प्रमाण मालेगाव तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे १७ टक्के आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व स्तरांतील लोकांना जागृत करणे गरजेचे आहे. तसेच ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावण्यात आले. रिक्षांना वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात स्टीकर लावण्यात आले. तरी अपघाताचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाप्रसंगी उपमहापौर नीलेश आहेर, न्यायाधीश गांधी, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, उपअधीक्षक प्रदीप जाधव, वाहतूक निरीक्षक बशीर शेख, मनोहर बच्छाव, कैलास बच्छाव, कै. ठगूबाई शंकर देवरे सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. देवरे, साळउंके, तुकाराम देवरे, धोंडगे, तुरेवाले, सूरज देवरे, पगार, किरण देवरे, आयनोर, हारुन शेख, वाहतूक पोलीस कर्मचारी व उपप्रादेशिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.