मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या चित्रपट निर्माते संजयलीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला शहरातील सर्वच चित्रपटगृहांवर बंदी घालावी या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी व राजपूत समाजबांधवांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. चित्रपट निर्माता संजयलीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटामुळे राजपूत समाजामध्ये असंतोष पसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध होत आहे. याचे पडसाद मालेगावीही उमटले आहे. इतिहासाचे विद्रुपीकरण करणारा चित्रपट बंद करावा, चित्रपट प्रदर्शित करू नये या मागणीसाठी येथील राजपूत समाज आक्रमक झाला आहे. बुधवारी सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी व राजपूत समाजाच्या पदाधिकाºयांनी मोर्चा काढला होता. मोर्चाला येथील भाजपाच्या तालुका कार्यालयापासून सुरुवात झाली. मोर्चा बाराबंगला, स्टेट बॅँक कॉर्नर कॅम्परोड मार्गे अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पवार, कॉँग्रेसचे नेते प्रसाद हिरे, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, बाजार समितीचे संचालक बंडू बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार देवरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात पंचायत समितीचे सभापती प्रतिभा सूर्यवंशी, नितीन पोफळे, हरिप्रसाद गुप्ता, शांताराम लाठर, संजय मगर, कुंदनसिंग ठोके, डोंगरसिंग ठोके, वासुदेव मगर, सुधीर देसले, धोंडू बोरसे, सुरेश सोनवणे, देवीप्रसाद सूर्यवंशी, सचिन बाचकर, सुनील शेलार, कैलास शर्मा, मदन ठोके, लखन पवार आदींंसह सर्वपक्षीय पदाधिकारी, समाजबांधव सहभागी झाले होते.
मालेगाव : ‘पद्मावत’च्या प्रदर्शनास राजपूत समाजाचा विरोध अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:02 AM
मालेगाव : वादग्रस्त पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वच चित्रपटगृहांवर बंदी घालावी या मागणीसाठी राजपूत समाजबांधवांनी मोर्चा काढला.
ठळक मुद्दे चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध समाजबांधव सहभागी