मालेगाव बाह्य (नाशिक)- मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री दादा भुसे २१,९१३ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर कॉँग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे यांचे आव्हान आहे.गत विधानसभा निवडणुकीत नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होेते; मात्र शिवसेना, भाजप व राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये सामना रंगला होता. यंदा राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे व सेना-भाजप महायुतीचे उमेदवार दादा भुसे या दोघांमध्ये चुरशीचा सामना होत आहे.मालेगाव बाह्य मतदारसंघात तीन लाख ३९ हजार ७१ मतदार आहेत. त्यापैकी एक लाख ७८ हजार ५५४, पुरुष तर एक लाख ६० हजार ५१४ महिला मतदार आहेत. तीन तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. बाह्य मतदारसंघात डॉ. तुषार शेवाळे व अभियंता असलेले दादा भुसे यांच्यात सरळ लढत होत आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व काँग्रेसचे डॉ. शेवाळे या दोहोंचाही मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. शिवाय कार्यकर्त्यांचेही जाळे आहे. यंदा युती-आघाडी झाल्याने दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी बळ वाढलेले आहे. सन २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेचे दादा भुसे व भाजपचे पवन ठाकरे यांच्यात सरळ लढत झाली होती. दादा भुसे यांना ८२ हजार ९३ मते मिळाली होती, तर भाजपचे पवन ठाकरे यांना ४४ हजार ६७२ मते मिळाली होती. राष्टÑवादी काँग्रेसचे सुनील गायकवाड यांना ३४ हजार ११७ मते मिळाली होती. या चुरशीच्या लढतीत भुसे यांनी विजयश्री खेचून आणली होती. या वेळची निवडणूक मात्र प्रतिष्ठेची बनली आहे.मागील निवडणुकीत युती आणि आघाडी दुभंगली होती. त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढविली गेली होती. त्यातून मतविभागणीचा फायदा विजयी उमेदवाराला झाल्याचे दिसून येते. आता मात्र, युती आणि आघाडी झाल्याने मतविभागणीचा धोका टळलेला आहे. शिवसेनेचे दादा भुसे हे सलग चौथ्या विजयाची नोंद करण्याच्या तयारीत असले तरी, यंदा त्यांच्यापुढे कॉँग्रेसच्या डॉ. तुषार शेवाळे यांनी तगडे आव्हान दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघात तुल्यबळ लढत बघायला मिळणार आहे. दरवेळी लढतीत असलेले हिरे घराणे यावेळी कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने आहे. त्यामुळे भुसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भुसे यांच्याकडून गेल्या तीन टर्ममधील विकासकामांवर आधारित मते मागितली जात असल्याने त्या तुलनेत शेवाळे यांची पाटी कोरी असल्याने लढत रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.
नाशिक निवडणूक निकाल : मालेगाव बाह्यमधून दादा भुसे आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:02 AM