आझादनगर : मालेगाव येथील परप्रांतीय डाळिंब व्यापारी पतीचा खून करून फरार झालेल्या पत्नीसह पहिल्या पतीस रमजानपुरा पोलिसांनी फलटण (जि. सातारा) येथून अटक केली. शुक्रवारी रात्री दोघा संशयिताना न्यायालयात हजर केले असता, न्यायमूर्ती जे.जे. इनामदार यांनी ७ मार्चपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. १४ फेब्रुवारीला मोहंमद सज्जाद मोहंमद बशीर यांची राहत्या घरी हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. अक्सा कॉलनी भागातील मोहंमदिया टॉवर येथे राहणारा मोहंमद सज्जाद मोहंमद बशीर (३६) मूळ रा. कराया परशुराय, जि.नालंदा (बिहार) या डाळिंब व्यापाºयाची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. सज्जाद हा परिसरातून डाळिंब खरेदी करून परराज्यात विक्री करायचा. सज्जादच्या हत्येच्या महिनाभरापूर्वी लग्न केलेली पत्नी नाजिया ही फरार झाल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. या प्रकरणी मयताचा भाऊ शमशाद आलमने तिच्यावरच संशय घेत फिर्याद दिल्याने तिच्या विरुद्धच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवून मुंबई, गोवा आदी ठिकाणी तपास केला होता. नाजियाचा पहिला पती हा हत्या झाली त्या दिवशी मालेगाव शहरात आला होता. त्यावरून त्याचा या हत्येशी संबंध असल्याची खात्री पटल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली रमजानपुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी अवघ्या १३ दिवसात शोध घेत पत्नी नाजिया मोहंमद सज्जाद, रा. अक्सा कॉलनी व पहिला पती मोहंमद आसिफ शेख जमील, रा. मुंबई यास अटक केली. सदर अटकेची कारवाई पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलीस हवालदार संजय महाले, सोमनाथ ह्याळीज, दिनेश पवार, संदीप सूर्यवंशी, रवींद्र बच्छाव, महिला शिपाई सुनीता धनराळे आदींच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव करीत आहेत. १४ फेब्रुवारीला मोहंमद सज्जाद मोहंमद बशीर यांची राहत्या घरी हत्या झाल्याचे उघडकीस आले होते.सज्जाद हा परिसरातून डाळिंब खरेदी करून परराज्यात विक्री करायचा.
मालेगाव : पोलीस पथकाने फलटण येथून घेतले ताब्यात खून प्रकरणी दोघांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 11:57 PM
आझादनगर : मालेगाव येथील परप्रांतीय डाळिंब व्यापारी पतीचा खून करून फरार झालेल्या पत्नीसह पहिल्या पतीस रमजानपुरा पोलिसांनी फलटण (जि. सातारा) येथून अटक केली.
ठळक मुद्देपाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीडाळिंब व्यापाºयाची राहत्या घरी हत्या