मालेगाव : महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वीची नाले, गटार सफाई, तसेच खड्डे बुजविण्याची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर कामे केली जात आहेत. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पाऊस होणार असल्याचे भाकीत केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने गेल्या महिनाभरापासून पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरुवात केली आहे.
महापालिका क्षेत्रात सुमारे छोटे - मोठे ३७ नाले आहेत, तर मुख्य गटारींचे तळ काढण्याचे काम सुरू आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली असल्याने नाले व गटार सफाईवर विशेष खर्च न करता महापालिकेकडून जेसीबी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने पावसाळ्यापूर्वीची कामे आटोपली जात आहेत. शहरातील आतापर्यंत ॲरोमा थिएटर ते अयोध्यानगरपर्यंतचा नाला, हिंमतनगर नाला, गुलशेरनगर नाला, जाफरनगर नाला या मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे, तर मुख्य गटारीदेखील स्वच्छ करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात पावसाचे पाणी साचू नये म्हणून उपाययोजना करण्यात येत आहे. पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी महापालिकेने कामांना सुरुवात केली आहे.
-----------------------------
रस्त्यांची पुनर्बांधणी
सलग दोन वर्षे पाऊस अधिक पडल्याने प्रभाग क्र. ९ मधील नववसाहत, डी. के. चाैक, बजरंग कॉलनी, शांतिनगर, भाऊसाहेब हिरे नगर, जय हिंद कॉलनी, प्रगती कॉलनी, प्रतापनगर, पारिजात कॉलनी, परिसरातील रस्ते पावसाळ्यामुळे खराब होत होते. सुमारे ५ कोटींच्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे. या रस्त्यांची सध्या पुनर्बांधणी करण्यात येत आहे. नगरसेवक सुनील गायकवाड यांनी या भागातील कामांसाठी ५० लाख रुपये मंजूर केले आहेत. यातून सूर्यवंशी लॉन्स ते रवींद्र मेडिकल, माऊली चौकपर्यंत भुयारी गटारीचे काम पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्याआधी हे काम पूर्ण होईल. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. रस्त्यांचे पर्यायाने महापालिकेचे आर्थिक नुकसान या गटारकामामुळे टळणार आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच्या कामांना प्राधान्य दिले असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
--------------------------
१९२ धोकादायक इमारती
मालेगाव महापालिका क्षेत्रात १५ अति धोकादायक, १४४ इमारती राहण्यायोग्य नाहीत, तर ३३ इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अशा १९२ इमारती महापालिकेच्या नगररचना विभागाने धोकादायक ठरविल्या आहेत. या धोकादायक खासगी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट कोणी करायचे, असा सवाल उपस्थित झाला आहे. धोकादायक खासगी इमारतींचे प्रभागनिहाय सर्वेक्षण करून नोंद घेण्यात आली आहे. इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत; मात्र ठोस कारवाई केली जात नाही. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
फोटो फाईल नेम : २७ एमएमएवाय ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन :
महापालिकेच्या प्रभाग ९ मध्ये पावसाळ्यापूर्वी सुरू असलेले भुयारी गटारीचे काम. तसेच या कामाची पाहणी करताना नगरसेवक सुनील गायकवाड.
===Photopath===
270521\27nsk_1_27052021_13.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.