पुरोगामी कार्यकर्त्यांचे एक शिबिर मनमाड चौफुली भागात झाले. यावेळी भोसले यांनी कार्यकर्त्यांना प्रमुख मार्गदर्शन केले. सुभाष परदेशी यांनी मालेगाव शहरात झालेल्या दंगलीची पार्श्वभूमी सविस्तरपणे समजावून सांगितली. ज्येष्ठ कार्यकर्ते डाॅ. सुगन बरंठ यांनी शिबिराबाबत मार्गदर्शन केले. चाळीसगाव येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षा वैशाली निकम, दिलीप चव्हाण, कल्पेश पाटील, साथी वाघ, नम्रता जगताप, शिबिरातले अनुभव सांगितले. प्रारंभी संविधान पुस्तिकेचा मान्यवरांचे हस्ते पुष्पहार घालून सन्मान केला. उमेश अस्मर, समिना कुरैशी, डॉ. संदीप खैरनार, गोकुळ वाणी, नसीम अहमद, सोमनाथ वडगे, नचिकेत काेळपकर, रामदास पगारे, रविराज सोनार, ॲड. मनोज चव्हाण यांचेसह अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, सत्यशोधक युवा आंदोलन आदिी पुरोगामी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने शिबिराचा समारोप झाला.
फोटो फाईल नेम : १९ एमजेयुएल ०४ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी पुरोगामी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना राजेंद्र भोसले. समवेत अंधश्रद्धा निर्मूलन समिती (चाळसगाव)च्या अध्यक्षा वैशाली निकम.
190721\405019nsk_38_19072021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.