मालेगाव : शासन सर्वसामान्य जनतेवर अन्याय करीत आहे. पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेध आंदोलन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. खरीप हंगाम सुरू झाला असताना इंधनाचे दर वाढले आहे. भविष्यात इंधनाचे दर भडकण्याची चिन्हे दिसत आहे. असे असताना राज्य व केंद्र शासन कुठल्याही उपाययोजना करताना दिसत नाही.यावेळी अपर जिल्हाधिकारी राऊत यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, सतीश पगार, साहेबराव देवरे, पोपट बोरसे, शशिकांत खैरनार, संजय पगार, दीपक बच्छाव, मधुकर सावंत, गोविंद बच्छाव, धर्मा भामरे, शशी पाटील, प्रभाकर जाधव, नंदू सावंत, लक्ष्मण पवार, रतन शेवाळे, साबीर गौहर, संतोष निकम आदींसह पदाधिकाºयांच्या सह्या आहेत.
इंधन दरवाढीचा कॉँग्रेसकडून निषेध मालेगाव : अपर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:42 AM
मालेगाव : शासन सर्वसामान्य जनतेवर अन्याय करीत आहे. पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेध आंदोलन केले.
ठळक मुद्देसर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटकाकेंद्र शासन कुठल्याही उपाययोजना करताना दिसत नाही