मालेगाव : येथील अंध शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या त्रिवेणीदेवी तुळशिराम पाटोदिया अंध विद्यालय व मधुकमल मतिमंद विद्यालयात राधेशाम काला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. संस्थेचे सचिव विकास पोतदार यांनी आभार मानले.
----------------------
दौलती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल
मालेगाव : येथील दौलती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियू स्कूल (सी.बी.एस.ई.) येथे प्रमुख अतिथी वसंतराव बच्छाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राचार्य गणेश शिंदे व विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमास विजय बच्छाव, उपप्राचार्य केतन सूर्यवंशी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संस्कृती निकम व भूमिका चौरे यांनी केले. तर मृदुला पगार यांनी आभार मानले.
फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन ०६ . जेपीजी
मालेगाव येथील दौलती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ध्वजारोहणप्रसंगी वसंतराव बच्छाव, प्राचार्य गणेश शिंदे, उपप्राचार्य केतन सूर्यवंशी, विजय बच्छाव आदींसह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
------------------------------
टी. के. आर. एच. विद्यालय, निमगाव
मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथील टी. के. आर. एच. विद्यालयात ध्वजारोहण मुख्याध्यापक आर. जे. निकम यांच्या हस्ते करण्यात आले. एन. सी. सी. विद्यार्थ्यांचे संचलन झाले. विद्यार्थ्यीनींनी राष्ट्रगीत व ध्वजगीत तसेच ज्येष्ठ शिक्षक एन. एम. मांडवडे यांनी संविधान म्हटले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे निवृत्त प्राचार्य अहिरे होते. सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख बी. बी. अहिरे यांनी केले. आभार एम. बी. शिरोळे यांनी केले.
-----------------------
सोयगाव महाविद्यालय
मालेगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोयगाव येथे संस्थेचे मालेगाव तालुका संचालक डॉ. जयंत पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी भेट दिली. प्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. पाटील व उपप्राचार्य प्रा. डॉ. एच. एम. क्षिरसागर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन ०७ . जेपीजी
फोटो कॅप्शन : सोयगाव महाविद्यालयात ध्वजारोहणप्रसंगी उपस्थित डॉ. जयंत पवार, प्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. एच. एम. क्षिरसागर, मनोहर बच्छाव, अ. र. पवार, एस. एस. देवरे, डॉ. सयाजी पगार, देवा निकम, संजय पाटील, पद्माकर पवार, अँड. एस. बी. इंगळे आदि.
------------------------
अजिंठा मंडळ प्राथमिक शाळा
मालेगाव : येथील अजिंठा मंडळ प्राथमिक शाळेत तुलसीदास बैरागी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक दिपक अहिरे, शारदा बैरागी, संस्थेचे अध्यक्ष सखाराम घोडके, यशवंत लिंगायत, सुभाष सूर्यवंशी, राजेंद्र लोहारकर, निलेश लिंगायत, पद्मजा जगताप, शीतल श्रीखंडे आदि उपस्थित होते.
------------------------
विनय मंदिर प्राथमिक शाळा
मालेगाव : विनय मंदिर प्राथमिक शाळेत बिपीन जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कविता कासलीवाल, विजय अहिरे, आशा खरे, अमित खरे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक धनंजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन यशवंत देवरे यांनी केले तर आभार प्रशांत ठाकरे यांनी आभार मानले.
-----------------------
आदर्श इंग्लिश मेडियम स्कूल, सोयगाव
मालेगाव : सोयगाव येथील मविप्र संचलित आदर्श इंग्लिश मेडियम स्कूल व आयटीआयचे ध्वजारोहण अरुण देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कैलास कचवे, सुधाकर निकम एन. टी. बच्छाव उपस्थित होते. मुख्याध्यापिका स्वाती देवरे, प्राचार्य एन. डी. बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रत्ना अहिरे यांनी केले.
---------------------
के. बी. एच. विद्यालय, शेरूळ
मालेगाव : तालुक्यातील शेरूळ येथील के. बी. एच. विद्यालयात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन. के. मिसर होते. त्यांनी ध्वजारोहण केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी. एस. वानखेडे यांनी केले. आभार एस. बी. शेवाळे यांनी मानले.
-------------------
सरस्वती विद्यालय, सायने
मालेगाव : तालुक्यातील सायने येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात रफीक शेख व राहूल चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. एच. टी. अहिरे होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन निंबा बोरसे यांनी केले.
-------------------
के. बी. एच. विद्यालय, टाकळी
मालेगाव : तालुक्यातील टाकळी येथील के. बी. एच. विद्यालयात मुख्याध्यापक बी. वाय. अहिरे यांनी ध्वजारोहण केले. सूत्रसंचालन एस. ओ. पवार यांनी केले. आभार डी. एस. सावंत यांनी मानले.
---------------
लिटील एन्जल स्कूल
मालेगाव : येथील लिटील एन्जल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष पवन ढंढारीया यांनी ध्वजारोहण केले. अध्यक्षस्थानी सुभाष वाघ होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंजू ढंढारीया, मुख्याध्यापक प्रकाश जगताप, महक पहिलवानी उपस्थित होते. सूत्रसंचालन मानसी दोशी, तनीष्क मगर यांनी केले. मनस्वी कदम यांनी आभार मानले.
-----------------
शैदा उर्दू स्कूल
मालेगाव : शैदा उर्दू हायस्कूल आणि मुदस्सीरनगर प्रायमरी शाळेत संस्थेचे अध्यक्ष हुसेन शैदा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापिका हुमैरा उपस्थित होते.
--------------
सेवा इंग्लिश स्कूल, खाकुर्डी
मालेगाव : तालुक्यातील खाकुर्डी येथील सेवा इंग्लिश स्कूलमध्ये उद्धव कोठावदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक टी. जी. हिरे होते. यावेळी संविधानाचे वाचन करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक व्ही. बी. कांबळे यांनी केले. पी. बी. भदाणे यांनी आभार मानले.
---------------------------
वाके परिसरात ध्वजारोहण
वाके : येथील ग्रामपंचायत कार्यलयातील ध्वजारोहण ग्रामसेवक सतिष इंगळे यांनी, सोसायटीचे ध्वजारोहण सभापती अर्जुन बच्छाव यांनी तर जि. प. मराठी शाळेत लष्करी जवान सचिन पगार यांनी ध्वजारोहण केले. गाईड पथकाचे ध्वजारोहण संजय खरात यांनी केले.