मालेगाव : शहरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. उड्डाणपुलाचा कार्यारंभ आदेश २५ सप्टेंबर २०१७ रोजी देण्यात आला आहे. २४ सप्टेंबर २०१९ रोजी पुलाचे काम पूर्णत्वास येणे अपेक्षित होते; मात्र मुदत संपूनही ठेकेदाराकडून पुलाचे काम केले जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शहराच्या पूर्ण भागातील उपकार सिनेमागृह ते सखावत हॉटेलपर्यंतचे उड्डाणपुलाचे काम सध्या रखडत सुरू आहे. आतापर्यंत केवळ ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. राज्य शासनाने या कामासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये मंजूर केले आहे. २५ सप्टेंबर २०१७ रोजी उड्डाणपुलाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. ठेकेदाराला दोन वर्षांची मुदत दिली होती. २४ सप्टेंबर २०१९ रोजी पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र पुलाच्या कामाचे कार्यारंभ आदेश देऊन साडेचार वर्षे उलटले आहेत. गेल्या पंधरवड्यापूर्वी माजी आमदार रशीद शेख यांनी या कामाबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. १ जुलैला ठेकेदाराने कामाला सुरुवात न केल्यास उड्डाणपुलावरच आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला होता. विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी उड्डाणपुलाच्या कामात खीळ घातल्याचा आरोपही माजी आमदार शेख यांनी केला होता. उड्डाणपुलाच्या विषयावरून विद्यमान आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल व महापालिकेतील सत्ताधारी कॉंग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला आहे. सद्य:स्थितीत ठेकेदाराने काम सुरू केले असले, तरी होत असलेले काम संथगतीने सुरू आहे. शहराच्या वैभवात भर टाकणारा प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून रखडला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरातील वाहतूककोंडी दूर होणार आहे. तसेच नवीन बसस्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या बसेसला मोकळा रस्ता उपलब्ध होणार आहे; मात्र या रखडलेल्या प्रकल्पामुळे मालेगावकरांच्या पदरी निराशा पडत असून वाहतूककोंडीच्या व धुळीच्या समस्येने नागरिक पुरते वैतागले आहेत.
फोटो फाईल नेम : ०७ एमजेयुएल ०५ / ०६ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील जुना आग्रा रोडवरील रखडलेले उड्डाणपुलाचे काम.
070721\07nsk_18_07072021_13.jpg~070721\07nsk_19_07072021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.~फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.