रस्त्याच्या डाव्या बाजूचा रस्ता पावसात हरविल्याने वाहतूक कोंडी होत असून, पाण्यातून जाणाऱ्या वाहनांना खड्ड्यांमधून सर्कस करीत जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. त्यावर पर्याय म्हणून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावरून सर्वच वाहने जात असून, पावसाचे पाणी नसलेल्या भागातूनदेखील खड्ड्यांना चुकवत जावे लागत आहे. या भागातही खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहन चालकांचे प्रचंड हाल होत असताना पादचाऱ्यांना मात्र गटारीच्या रस्त्यावर आलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत अनेक आंदोलने पाहिलेल्या जाफरनगर भागातील रस्त्यांची दैना काही संपत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. तात्पुरती मलमपट्टी केल्यानेच रस्त्यांवर वारंवार खड्डे पडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
मालेगाव : जाफरनगरातील रस्ता हरवला पावसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:15 AM