मालेगाव : मालेगाव - सटाणा रस्त्यासह तालुक्यातील अन्य रस्त्यांच्या विकासासाठी ४३ कोटींचा निधी या अर्थसंकल्पीय वर्षासाठी मंजूर केला असून, लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी दिली.
मालेगाव - सटाणा रस्ता जास्त रहदारीचा असल्याचे तसेच अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याबाबत पाठपुरावा सुरु होता. या रस्त्याचे तालुक्याच्या हद्दीपर्यंत टप्प्याटप्प्याने काँक्रिटीकरण होणार असून, पहिल्या टप्प्यात मालेगाव ते दाभाडीपर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाला मंजुरी मिळाली आहे.
राज्य विधीमंडळाच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात या महत्त्वाच्या कामांना मंजुरी मिळाली असून, दोन पुलांसह तालुक्यातील रस्त्यांची कामे मंजूर झाली असल्याचे भुसे यांनी सांगितले.