झोडगेसर्वत्र खरीप हंगामाची लगबग सुरू असताना, एका विशिष्ट कंपन्याच्या कपाशी बियाणे वाणाचा तुटवडा बाजारात निर्माण झाला आहे. बियाण्याची नोंदणी दुकानदारांना नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच करावी लागते. एक हजार पाकीट नोंदणी केल्यास तीनशे पाकिटेच मिळतात. तसेच अजित १५५ चे जास्त पाकिटे घ्यावयाची असल्यास इतर वाणांचे बियाणे घेतले तरच सदर बियाणे पाकीट वाढवून मिळते किंवा मोठ्या विक्रेत्यांना जास्त पैसे दिले तरच त्याचा पुरवठा लहान विक्रेत्यांना केला जातो. त्यामुळे एकीकडे शासननिर्णयास हरताळ फासला जात असून, शेतकऱ्यांचा कल बघून त्याचीही लूट केली जात आहे. अजित १५५ च्या तोडीचे सरस कपाशी बियाणे बाजारात उपलब्ध असताना शेतकरी एकाच बियाण्याच्या मागे धावताना दिसतात. त्यामुळे कपाशीचे बियाणे मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध असताना एका विशिष्ट वाणाचाच तुटवडा निर्माण होतो.यापूर्वी ‘राशी २’ या कपाशी बियाण्याच्या वाणाबाबत अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पर्यायाने हे बियाणे चढ्या भावाने विक्री होत होते. पण नंतर या वाणाच्या बियाण्याची रोपे लाल पडू लागल्याने या वाणाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. आता या कपाशी वाणाची कोणीही मागणी करताना दिसून येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर चांगल्या वाणांच्या बियाण्यांची कपाशीची लागवड करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
े मालेगाव : शेतकरी वर्गाची आर्थिक पिळवणूककपाशी बियाण्याचा तुटवडा
By admin | Published: June 15, 2015 11:24 PM