यामध्ये अनुक्रमे अनुज्ञप्ती नूतनीकरण, पत्ता बदल, दुय्यम प्रत, आयडीपी प्रकारातील कामे, वाहन नोंदणी, हस्तांतरण, कर्ज बोजा उतरविणे-चढविणे, नोंदणी प्रमाणपत्र दुय्यम प्रत, नोंदणी नूतनीकरण, परवानाविषयक सर्व कामकाज, खटलाविषयक सर्व कामकाज सुरू करण्यात येणार आहे. तरीदेखील नागरिकांनी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन सुविधेचा वापर करून अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही बीडकर यांनी केले आहे, तर अनुज्ञप्ती कामकाजाचा दैनंदिन कोटा पुढीलप्रमाणे शिकाऊ अनुज्ञप्ती ७० पक्की अनुज्ञप्ती ७० तसेच योग्यता प्रमाणपत्राकरिता वाहन वर्गानुसार दैनंदिन कोटा टुरिस्ट/मीटर टॅक्सी १, ऑटोरिक्षा ३ बस २, हलके वाहन ८, जड वाहन १० याप्रकारे दैनंदिन कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे शिबिर कार्यालयाचे कामकाजदेखील गुरुवार १४ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याचेही बीडकर यांनी नमूद केले आहे.
मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:10 AM