शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

मालेगाव तालुक्यात कडकडीत बंद

By admin | Published: June 06, 2017 2:00 AM

मालेगाव : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी यासह अन्य मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

 लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी यासह अन्य मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शंभर टक्के बंद यशस्वी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला.टेहरे, वडेल, डाबली, करंजगव्हाण येथील गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. करंजगव्हाण येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकातम्क पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी खाकुर्डी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. मालेगाव तालुक्यात शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला. तालुका शिवसेनाप्रमुख संजय दुसाने, शहरप्रमुख श्रीराम मिस्तरी, सुनील चांगरे, अनिल पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सकाळी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.मोसमपुलावरील लोढा मार्केटमध्ये सेनेतर्फे बंदचे आवाहन करीत असताना छावणीचे पोलिसांचा ताफा दाखल झाला. पोलिसांनी दिनेश ठाकरे यांना ताब्यात घेतले. ठाकरे यांना पोलीस ठाण्यात दिवसभर बसवून ठेवण्यात आले होते. शहरासह तालुक्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता. पूर्व भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला, तर पश्चिम भागात कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे दिसून आले.यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख रामा मिस्तरी, दत्ता चौधरी, भारत बेद, भीमा भडांगे, तानाजी देशमुख, यशपाल बागुल, शरद पाटील, गोविंद गवळी, राजू टिळेकर आदी उपस्थित होते.वडेल येथे बंदतालुक्यातील वडेल येथे शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करीत कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलनावेळी समाधान अहिरे, विलास अहिरे, जगन अहिरे, कांतीलाल पवार, बबलु देवरे, दशरथ बच्छाव, संजय जाधव, माधव सोनवणी उपस्थित होते.टेहरेत बंदयेथे शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून गावात १०० टक्के बंद पाळण्यात आला. परिसरातील शेतकऱ्यांनी संपात सहभाग घेऊन भाजीपाला, दूध, शेतमाल गावाबाहेर जाऊ दिला नाही. दूध गावातील ग्रामस्थांमध्ये वाटून दिले. काही लोक दूधविक्रीला जात असताना त्यांना संपाबाबत माहिती देऊन विनंती करुन शांततेने घरी पाठविले. संप शांततेत यशस्वी करण्यासाठी सर्व शेतकरी प्रयत्नशील असून, प्रशासनातर्फे कारण नसताना गावातील तरुणांच्या घरी रात्री- पहाटे पोलीस कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे गावात अशांततेचे वातावरण आहे. वेळप्रसंगी खोटे गुन्हे दाखल केल्यास रास्ता रोको करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. शांततेने आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी शांततेत आंदोलन करु द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.वाके परिसरात बंदवाकेसह परिसरात शेतकऱ्यांनी आंदोलन करीत कडकडीत बंद पाळला. चावडीवर बैठक घेऊन बंद शांततेत पार पाडण्याचे ठरविण्यात आले. मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावर गेल्या आठवड्यापासून शेतमालाचे कोणतेही व्यवहार होऊ शकले नाही. त्याचा फटका बाहेर गावाहून आलेल्या कांदा खरेदीदारांना बसला. त्यामुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली. बंदचा परिणाम मुंगसे, आघार, पाटणे, वाके, टाकळी, सोनजे, सौंदाणे, नांदगाव, चिंचावड, माळीवाडे आदि गावांत दिसून आला. दाभाडी येथे कॅण्डल मार्चलोकमत न्यूज नेटवर्कदाभाडी : येथे किसान क्र ांती प्रचारक समितीच्या वतीने सरकारचा निषेध करत शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी तसेच दाभाडी बंदची हाक देत कँन्डल मोर्चा काढण्यात आला. गावातील नवीन प्लॉटपासून ते मुख्य बाजारपेठेमार्गे ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांनी कॅण्डल मार्च काढला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी, शेतमालाला हमीभाव मिळावा आदी घोषणा देत बंदचे आवाहन करण्यात आले. गावातील प्रवेशद्वाराजवळ मोर्चाची सांगता करण्यात आली. मोर्चात डॉ. एस. के. पाटील, अमोल निकम, प्रमोद निकम, हरिदादा निकम, नीलकंठ निकम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संजय देवरे, अशोक निकम, सुभाष निकम, बापू निकम, अंबू निकम, शिवाजी निकम, अंताजी निकम, अरु ण अहिरे, संजय मन्साराम देवरे, सुधाकर निकम, विशाल गोसावी, विवेक साळुंके, काकाजी निकम, मंगेश निकम, प्रवीण निकम आदींसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.