त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मौजे माळेगांव येथील महिलांनी दारु आड्यांवर धाड टाकून दुकाने उध्वस्त केले आहे .गेल्या काही वर्षांपासून परिसरात अनेक महिला याचा बळी ठरत होत्या. पुरु षांनी दारू पिऊन बायको-मुलांना मारहाण करीत. यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागले होते. असताना माळेगाव येथील महिलांनी अनोखे धाडस दाखविले. एक पाऊल पुढे टाकत पोलीस प्रशासन व गावकº्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून आपला त्रास आपणच संपवला पाहिजे या ध्येयाने एकत्र येत दारू दुकांनाची दारूच्या बाटल्यांसहित गावातून धिंड काढली ,जे पोलिस प्रशासनाला इतक्या दिवसात जमले नाही ते या महिलांनी करून दाखवल्याने गावासह तालुक्यात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.परिसरात अवैध व्यवसाय कुणाच्या आशीर्वादाने चालतात हा प्रश्न चर्चिला जात आहे.तालुक्यात अवैध धंद्याना अगदीच उत आला आहे , हरसूल व परिसरात दमण व दादर नगर हवेलीची दारू आणून विकली जात आहे. तसेच गावठी दारूही विकली जाते. हे धंदे कुणाच्या आशीर्वादाने चालतात हा प्रश्न चर्चिला जात आहे.माळेगाव येथे सिमेंट काँक्र टीकरणच्या रस्त्याला होल पाडून दारूची साठवण केली होती , तोही साठा जप्त करण्यात आला , शेत माळावरील शेतात दारूची साठवूनक केली होती. गावातील महिलांनी दुकाने उध्वस्त करून चौघांविरोधात हरसूल पोलीस ठाण्यात दारु बंदी कलमानुसार गुन्हा नोंदविला आहे.
माळेगाव येथे महिलांची दारूअड्डयावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 4:28 PM
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मौजे माळेगांव येथील महिलांनी दारु आड्यांवर धाड टाकून दुकाने उध्वस्त केले आहे . गेल्या काही वर्षांपासून परिसरात अनेक महिला याचा बळी ठरत होत्या. पुरु षांनी दारू पिऊन बायको-मुलांना मारहाण करीत. यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागले होते.
ठळक मुद्देरूद्रावतार: बाटल्यांची धिंड काढून दुकान केले उध्वस्त