निमगाव परिसरात सद्य:परिस्थितीत एकही रुग्ण नाही. शासनाच्या परिपञकानुसार आरोग्य अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी व सर्व पालक यांच्या संमतीने शाळा सुरू कराव्यात असा आदेश पाहता या सहविचार सभा घेण्यात आली.
उपशिक्षक व्ही. व्ही. हिरे यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक एन. एम. मांडवडे यांनी सर्व विभाग, तसेच विद्यालयात राबविण्यात आलेल्या स्पर्धांचे अहवाल वाचन केले. निमगाव ग्रामीण आरोग्य रुग्णालयाच्या आरोग्याधिकारी डॉ. श्रीमती एम. एन. शिंदे यांनी पालकांना व शिक्षकांना कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी याची शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली. याप्रसंगी पालक शगोविंद अहिरे, मिलिंद अहिरे, उपमुख्याध्यापक दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक पगार यांनी मार्गदर्शन केले. पालक संघाचे उपाध्यक्ष दर्शन हिरे, सहसचिव दिलीप हिरे माता पालक संघाची उपाध्यक्षा रेखा हरिभाऊ अहिरे यांची निवड करण्यात आली.
सांस्कृतिक विभागप्रमुख बी. बी. अहिरे यांनी सूत्रसंचालन केले, तर एम. बी. शिरोळे यांनी आभार मानले.