संगमेश्वर : आजची भारतीय पिढी आपली मूळ संस्कृती विसरून पश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करीत असून, त्यामुळे आईने केलेले संस्कार विसरत चालली आहे. त्यांना मातृप्रेमाच्या संस्कारांची गरज असून, साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक आजच्या पिढीला मार्गदर्शक असल्याने हे पुस्तक घराघरांत पोहचविण्यासाठी राष्टÑ सेवा दलाने एक विशेष अभियान हाती घेतले आहे. त्यास प्रतिसाद लाभत आहे. साने गुरुजी यांची आई यशोदाबाई यांचे स्मृतिशताब्दी वर्ष गेल्या वर्षी साजरे करण्यात आले. या वर्षात शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्टÑातील सामाजिक व शैक्षणिक संस्थांना आवाहन करून श्यामची आई हे पुस्तक घराघरात पोहचविण्याचे आवाहन केले होते. त्यास राष्टÑ सेवा दलाने प्रतिसाद देऊन वर्षभरात सुमारे २ हजार पुस्तके जिल्ह्यात मोफत वितरित केली. राष्टÑ सेवा दलच्यादत्ता वडगे, दिनेश ठाकरे, कमलाकर देसले, विलास वडगे, स्वाती वाणी, संगीता चव्हाण, आबा गायकवाड, राजेंद्र ठाकरे, गोकुळ वाणी (सर्व, मालेगाव) वसंत राऊत (नाशिक), सागर गुजर (सिन्नर), कमलाकर कहाने (निफाड), मंगेश सातपुते (संगमनेर) आदींनी पुस्तके खरेदी करून विद्यार्थी, शाळा, शिक्षकांमध्ये मोफत वितरित केले. याशिवाय या. ना. जाधव विद्यालय, किनो एज्युकेशन सोसायटी, ल. रा. काबरा विद्यालय, आई प्रतिष्ठान, बार्टी संस्था, साने गुरुजी आरोग्य मंदिर, आधार फाउंडेशन आदी अनेक संस्थांनी याकामी सहकार्य केले. हे अभियान यंदाही सुरू राहणार आहे. यावर्षी किमान ४ हजार पुस्तके वितरित करण्याचा संकल्प राष्टÑ सेवा दल मालेगावने केला आहे. या उपक्रमासाठी इचलकरंजीच्या राष्टÑ सेवा दलाच्या सैनिकांतर्फे जवळपास निम्मा किमतीत पुस्तके पुरविण्यात आली. या अनुषंगाने कॅम्पातील बाल विद्यानिकेतन प्राथमिक शाळा येथे पहिला उपक्रम राबविण्यात आला. अध्यक्ष सरस्वती काळे, उपाध्यक्ष कल्पना देवरे यांनी आई विषयावर निबंध, कविता वाचन, हस्तलिखित आदी स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली. नचिकेत कोळपकर यांनी जिल्हाभरात व्याख्याने दिली. साने गुरुजी यांची आई यशोदाबाई यांची स्मृतिशताब्दी गेल्या वर्षी साजरी करण्यात आली. शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्टÑातील सामाजिक व शैक्षणिक संस्थांना आवाहन करून ‘श्यामची आई’ हे पुस्तक घराघरांत पोहोचविण्याचे आवाहन केले होते. त्यास राष्टÑ सेवा दलाने प्रतिसाद देऊन वर्षभरात सुमारे दोन हजार पुस्तके जिल्ह्यात मोफत वितरित केली. याकामी किनो एज्युकेशन सोसायटी, आई प्रतिष्ठान, साने गुरुजी आरोग्य मंदिर आदी संघटनांनी सहकार्य केले. यावर्षी किमान चार हजार पुस्तके वितरित करण्याचा संकल्प राष्टÑ सेवा दल मालेगावने केला आहे. या उपक्रमासाठी इचलकरंजीच्या राष्टÑ सेवा दल सैनिकांतर्फे निम्मा किमतीत पुस्तके पुरविण्यात येणार आहेत. कॅम्पातील बाल विद्यानिकेतन प्राथमिक शाळेत येथे पहिला उपक्रम राबविण्यात आला.
मालेगाव : राष्टÑ सेवा दलासह विविध संस्थांनी घेतला पुढाकार ‘श्यामची आई’ला घराघरांत पोहचविण्याचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 12:49 AM
संगमेश्वर : आजची भारतीय पिढी आपली मूळ संस्कृती विसरून पश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करीत असून, त्यामुळे आईने केलेले संस्कार विसरत चालली आहे.
ठळक मुद्दे२ हजार पुस्तके जिल्ह्यात मोफत वितरितअभियान यंदाही सुरू राहणार