लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : भाजीपाला व फळ विक्रीची वेळ दररोज सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत करावी, या मागणीसाठी येथील महात्मा फुले भाजी मार्केटमधील विक्रेते, व्यापाऱ्यांनी शनिवारी दुकाने बंद करून ठिय्या आंदोलन केले. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती मो इस्माईल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्य शासनाने सध्या संचारबंदी लागू केली आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेतच भाजीपाला व फळे व इतर दुकाने सुरू ठेवण्याची मुभा आहे. मात्र, भाजीपाल्याचे व्यापारी पहाटेपासून मुख्य बाजार समितीतून भाजीपाला खरेदी करून दहा वाजेपर्यंत दुकानावर येत असतात. त्यानंतर भाजीपाला विक्रीला ठेवला जातो, मात्र पोलीस ११ वाजताच दुकाने बंद करत असल्यामुळे खरेदी केलेल्या भाजीपाल्याची नासाडी होते. व्यापाऱ्यांचा पैसा वाया जात आहे. ग्राहक ११ वाजल्यानंतर घराबाहेर पडतात. मात्र, दुकाने ११ वाजता बंद केली जात असल्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या भाजीपाला विक्रेत्यांनी शनिवारी सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये ठिय्या आंदोलन केले. भाजीपाला विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद करून या आंदोलनात सहभाग घेतला. सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत भाजीपाला व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी विक्रेत्यांनी केली. या आंदोलनात गणेश शिवदे, आरिफ शेख, सुभाष माळी, धीरज अहिरे ,गणेश विसपुते, प्रवीण अहिरे, रवींद्र अहिरे, मनोज बच्छाव, विशाल सूर्यवंशी, जयंत बाविस्कर, आनंद सोनवणे, आदींसह फळ व भाजीपाला विक्रेते सहभागी झाले होते.
-------------
भाजीपाला विक्रीच्या वेळेत वाढ करावी, या मागणीसाठी मालेगाव येथील महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेते व इतर व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. (२४ मालेगाव १)
===Photopath===
240421\24nsk_12_24042021_13.jpg
===Caption===
२४ मालेगाव १