ठळक मुद्दे विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
मालेगाव : मालेगाव शहराचा पाणीपुरवठा शनिवार (दि.१७)पासून पूर्ववत सुरळीत झाला आहे.शुक्र वारी (दि.१४) गिरणा धरणात मृत मासे आढळून आले होते. विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे तातडीने पंपिंग स्टेशन बंद करण्यात आले होत.े मात्र शुक्र वारी रात्री पाणीपुरवठा विभागाचे अभियंता जयपाल त्रिभुवन, सचिन माळवाळ, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक यांनी गिरणा धरण क्षेत्रातील पंपिंग स्टेशन परिसराची पाहणी केली. या ठिकाणी मासे विहार करताना आढळून आले. याची माहिती आयुक्त दीपक कासार यांना देण्यात आली होती. त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा सुरळीत केला आहे.