मालेगाव : येथील हुडको कॉलनीत एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. सायंकाळी सव्वासात वाजता अतहर हुसैन अहमद हुसैन मलिक (२५) रा.हिरापन्ना कॉलनी या तरु णावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी धाव घेऊन जमावास शांतता राखण्याचे आवाहन केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत इमरान (पुलाव) विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मालेगावी तरुणाचा खून
By admin | Published: June 06, 2017 3:43 AM