शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

एक अपवादवगळता मालेगावकर उपेक्षितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 1:00 AM

आजवर झालेल्या १६ लोकसभा निवडणुकांपैकी फक्त एक अपवादवगळता मालेगाव शहर व तालुक्याच्या एकाही उमेदवाराला लोकसभा निवडणूक जिंकता आलेली नाही.

संगमेश्वर : आजवर झालेल्या १६ लोकसभा निवडणुकांपैकी फक्त एक अपवादवगळता मालेगाव शहर व तालुक्याच्या एकाही उमेदवाराला लोकसभा निवडणूक जिंकता आलेली नाही. मतदारसंघ असूनही मालेगावकर याबाबत उपेक्षितच राहिले आहेत.  १९५७ पासून मालेगाव हा स्वतंत्र मतदारसंघ झाला. यावेळी प्रजा समाजवादी पक्षाचे उमेदवार यादवराव नारायण जाधव यांनी भारतीय राष्टÑीय काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रेय बीडकर यांचा ४१ हजार मतांनी पराभव करून लोकसभेत प्रवेश केला.१९६७ पासून मालेगाव लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला. मालेगाव तालुक्यातील काही उमेदवारांनी वेळोवेळी निवडणुका लढविल्या; मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. २००९ पासून मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य हे मतदारसंघ धुळे मतदारसंघाला जोडले गेले आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघ स्वतंत्र व बिगरराखीव मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला.२००९च्या निवडणुकीत मालेगाव शहरासह ज्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ विधानसभेत प्रतिनिधित्व केले, त्या माजी मंत्री निहाल अहमद यांनी लोकसभेची निवडणूक लढविली; मात्रत्यांच्याही पदरात यश पडले नाही. आपतर्फे माजी आमदार हारुण अन्सारी यांचे पुत्र व जेएटी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निहाल अन्सारी यांनीही निवडणूक लढविली होती. मात्र त्यांनाही पराभव चाखावा लागला होता.या. ना. जाधव यांची कर्मभूमी मालेगाव होती. त्यानंतर १९६२ मध्ये मात्र त्यांचा माधवराव जाधव (भा. रा. काँग्रेस) यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. मालेगाव भागासह संपूर्ण जिल्ह्यात या. ना. जाधव यांनी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. समाजवादी चळवळीत त्यांचे योगदान मोठे होते.

टॅग्स :lok sabhaलोकसभाMalegaonमालेगांव