मालेगाव: शहर परिसरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी मालेगावचे तापमान ४३.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. एप्रिल अखेरच उन्हाचा प्रचंड तडाखा बसू लागला आहे. दिवसभर उष्णतेने काहिली होत होती. गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत आहे. शहर परिसरातील तापमान दिवसागणिक वाढतच आहे. उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही उन्हामुळे काहिली वाढल्याने नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी ,गॉगल, उपरणे आदींचा वापर करताना दिसत आहेत.
मालेगावचा पारा चढाच; उन्हाची तीव्रता आणखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 1:29 AM