जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा, इंदोर, गुजरात, नाशिक, मुंबई, पुणे, ठाणे जाणाऱ्या-येणाऱ्या बसेस या पुलावरून जातात. मात्र मालेगाव मध्यकडे ,बस स्टॅण्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना अपघातांचे प्रमाण वाढले आहे. लोकांना पाठीच्या हाडांचे विकार जडले आहेत. पुलावरून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वार व रिक्षाचालक जेरीस आले असून महानगरपालिका कधी जागी होईल, असा सवाल विचारला जात आहे.
सदर पुलावरून जाताना खड्डे टाळण्याच्या नादात दुचाकीस्वार, रिक्षाचालक यांचा तोल जाऊन नदीत पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खड्डे टाळण्याच्या नादात दुसऱ्या गाडीस धक्का लागल्यास भांडणात पर्यवसान होत आहे. मनपाने मोसम पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
कोट...
मालेगाव महानगरपालिकेच्या हद्दीत मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. मोसम पुलासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी प्रचंड खड्डे पडलेले असतात प्रशासन व लोकप्रतिनिधी कोणतीही दखल घेण्यास तयार नाहीत.
- निखिल पवार, सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव
240821\24nsk_36_24082021_13.jpg
मोसम पुलाची झालेली दूरवस्था