अपघातात अब्दुल रऊफ शेख भिकन मनियार (६५) महेजबिन अब्दुल रऊफ शेख मनियार(५५) मूळ राहणार चाळीसगाव जि. जळगाव (ह.मु. महात्मा गांधी पुतळ्याजवळ देवळाली, नाशिक) या दाम्पत्यासह हाजी अब्दुल्ला कय्युम अब्दुल अजीज मनियार (४१) मूळ राहणार पिलखोड (हल्ली मुक्काम ठाणे) यांचा मृत्यू झाला आहे. मालेगावच्या सैलानी चौक भागातील सुपरिचित जिलेबी व्यावसायिक हाजी शेख अहमद यांचे चिरंजीव मुदस्सर शेख यांचा सुरत येथील शेख खलील गनी यांची सुकन्या सुमैय्यासोबत शुक्रवारी (दि. ५) विवाह सोहळा पार पडणार होता. या विवाह समारंभासाठी वऱ्हाडी मंडळी मालेगाव येथून रात्री खासगी ट्रॅव्हल्स बसने (क्रमांक जीजे ०५ झेड ४००२) सुरतकडे रवाना झाले होते. परंतु, रस्त्यातच मनियार कुटुंबावर काळाने घाला घातला. सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वालोद गावाजवळ बस महामार्गावर उभ्या असलेल्या टँकर (क्रमांक जीजे १० टीव्ही ४७५५)वर जाऊन आदळली. यात तीन जण जागीच ठार झाले तर सुमारे पंधरा ते वीस जण जखमी झाले आहेत. यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की, बसचा अक्षरशः अर्धा भाग कापला गेला आहे. मृतांमध्ये चाळीसगाव येथील नवरदेवाचे काका-काकू व मूळचे पिलखोड येथील मुंबई पोलीस दलाच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
इन्फो
शोकाकुल वातावरणात विवाह उरकला
विवाह समारंभासाठी येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या बसला अपघात झाल्याने सुरत येथील शेख कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले. त्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली होती. सकाळचा होणारा विवाह दुपारी तीन वाजता साधेपणाने उरकण्यात येऊन वऱ्हाडी मंडळी मालेगावकडे रवाना झाली. या घटनेने दोन्हीकडील कुटुंब हदरून गेले होते.
फोटो- ०५ मालेगाव ॲक्सीडेंट १/२
===Photopath===
050221\05nsk_37_05022021_13.jpg~050221\05nsk_38_05022021_13.jpg
===Caption===
फोटो- ०५ मालेगाव ॲक्सीडेंट १~फोटो- ०५ मालेगाव ॲक्सीडेंट २