मालेगाव कलेक्टरपट्टा : परिसरात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. अशातच ढगाळ वातावरणाच्या छायेत थंडीच्या लाटेचे आगमन झाले आहे तर गरम उबदार कपड्यांची दुकानेही सजली असून, खरेदीसाठी ग्राहकांच्या गर्दीने भरली आहेत.पावसाळा संपला की, हिवाळ्याच्या गुलाबी थंडीची चाहूल लागते. मग घरात ठेवलेल्या उबदार कपड्यांची शोधाशोध तर कुणी नवीन कपडे बाजारातून खरेदी करण्याची लगबग सुरू होते.सर्दी, पडशापासून बचाव करण्यासाठी औषधे, त्वचा कोरडी पडू नये म्हणून वेगळ्या क्रीमचा खर्च होतो. तो टाळण्यासाठी गतवर्षाप्रमाणे यंदाही गुलाबी थंडीचा जोर वाढल्याने शहरातील बाजारासह संगमेश्वर, मालेगाव कॅम्प, सटाणा रोड आदि परिसरात उबदार कपडे, स्वेटर, जॅकेट आदी कपड्यांची दुकाने सजली आहेत. यंदाही शहराबरोबरच जुना आग्रा रोडच्या काठावर उबदार कपड्यांची दुकाने ग्राहकांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत.
मालेगावी उबदार कपड्यांची दुकाने सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 10:35 PM