गेल्या आठ दिवसांपासून शहर स्वच्छतेसाठी घंटागाडी कचरा गोळा करण्यासाठी येत नाही. महादेव मंदिर चौक, मोसमपूल, म. फुले रोड यासह संपूर्ण परिसरातील चौकात ठेवलेल्या कचराकुंड्या कचऱ्यांने पूर्ण भरल्या आहेत महापालिका स्वच्छतेच्या महिला कर्मचाºयांनी चौकाचौकात आडोसा करून कचºयाचे ढीग साठविले आहेत. परिणामी दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच सोमवारी रात्री शहर परिसरात वादळी वाºयासह अवकाळी पाऊस पडल्याने कचरा ओला होऊन दुर्गंधीमध्ये वाढ झाली आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता कचरा गोळा करणाºया छोट्या घंडागाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. या गाड्यांचे पत्रे सडून खराब झाले आहेत. मालेगाव महापालिकेकडे दुरुस्तीची साधनसामग्री उपलब्ध नसल्याने गाड्या नादुरुस्त आहेत छोट्या गाड्या उपयुक्त ठरणार; मात्र त्या नादुरुस्त असल्याने गल्ल्यागल्लीतील कचरा उचलण्याचे काम थांबले आहे. परिणामी घंटागाड्या येण्याचेही बंद झाले. त्यातच राष्टÑपुरुषांच्या जयंतीमुळे कामगार वर्गाला दोन दिवस सुटी असल्याने कचरा उचलण्याचे काम ठप्प झाले आहे. परिसरातील कचरा उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मालेगावी कचराकुंड्या साचल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 6:38 PM