मालेगाव : नायब तहसीलदाराला राजपत्रित अधिकाºयाचा दर्जा द्यावा, महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती द्यावी यासह विविध मागण्यांप्रश्नी येथील महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून बेदमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.राज्य महसूल कर्मचारी संघटनेने नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण २१ टक्क्यावरून २० टक्के करावे, अव्वल कारकून संवर्गातील वेतन श्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात, उपजिल्हाधिकारी पदासाठी गृहविभागाच्या धरतीवर महसूल कर्मचाºयांसाठी ५ टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात या मागण्यांप्रश्नी संपावर जाण्याची हाक दिली होती. या संपात येथील ५० महसूल कर्मचारी सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कर्मचाºयांनी काळ्याफिती लावून धरणे आंदोलन केले.राज्य वाहनचालक संघटनेनेही या संपाला पाठिंबा दिला. धरणे आंदोलनात संघटनेचे नीलेश नागमोती, एम. झेड. अहिरे, नितीन विसपुते, शेखर अहिरे, गणेश मारक, दिलीप शिंदे, मधु व्यवहारे, मीनाक्षी कदम, वाहन चालक संघटनेचे विलास जाधव आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.
मालेगावी महसूल कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 11:07 PM
ंमालेगाव : नायब तहसीलदाराला राजपत्रित अधिकाºयाचा दर्जा द्यावा, महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती द्यावी यासह विविध मागण्यांप्रश्नी येथील महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून बेदमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.
ठळक मुद्दे तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कर्मचाºयांनी काळ्याफिती लावून धरणे आंदोलन केले.