मालेगाव : शहरातील मोसमपूल व नवीन बसस्थानकाजवळ असे दोन नवीन शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शहरातील केंद्रांची संख्या आता तीन होणार आहे.बुधवारी जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी नियोजित केंद्र स्थळांची पाहणी करून सोईसुविधांचा आढावा घेतला.राज्य शासनाने दहा रुपयांत सर्वसामान्य नागरिकांना भोजन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी देखील केली जात आहे.यापूर्वी बाजार समितीच्या आवारात दाभाडी येथील साई श्रद्धा बचतगट व सामाजिक संस्थांकडून शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सदर केंद्रावर २०० थाळ्या दररोज वाटप केल्या जात आहेत.आता मोसम पुलावर स्वामी समर्थ बचतगट व नवीन बसस्थानकाजवळ फातेमा निकहत बचतगटाला शिवभोजन थाळीचा ठेका देण्यात आला आहे.शहरात आता तिन्ही केंद्रांवर ६०० शिवभोजन थाळी उपलब्ध होणार आहे. या नियोजित केंद्राची जिल्हा पुरवठा अधिकारी नरसीकर यांनी पाहणी केली. यावेळी तहसीलदार चंद्रजित राजपूत उपस्थित होते.
मालेगावी दोन नवीन शिवभोजन थाळी केंद्र होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 6:15 PM