मालेगाव : गौण खनिज खदानी व खडीक्रशर यंत्राची तपासणी करण्यासाठी आलेल्या जिल्हा खनिजकर्म अधिकारी आनंद पाटील यांच्या पथकावर अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याचा प्रकार सायने शिवारात घडला. गौणखनिज वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर दगडफेक करणाऱ्यांनी पळवून नेले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.शहरालगतच्या सायने एमआयडीसी लगत खदानी आहेत. तसेच सायने व चाळीसगाव रस्त्याला खडीक्रशर यंत्र आहेत. रॉयल्टी, खानकाम आराखडा, या उद्योगांमुळे पर्यावरणाची हानी तर होत नाही ना, रितसर सक्षम अधिकाºयाची परवानगी घेतली आहे काय, या बाबींची तपासणी करण्यासाठी जिल्हा खनिजकर्म अधिकारी पाटील गुरूवारी (दि.२३) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सायने शिवारात सायने मंडल अधिकारी काळे, करंजगव्हाण मंडल अधिकारी मोरे, दाभाडी मंडल अधिकारी शेवाळे, कॅम्प तलाठी भिसे, सायने तलाठी एन. एस. पवार या पथकासह गेले होते. यावेळी खदानींमधुन पाच ते सहा ट्रॅक्टरद्वारे गौणखनिजाचा उपसा सुरू होता. पाटील व पथकाने ट्रॅक्टरांच्या चाव्या ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता अज्ञात चाळीस ते पन्नास जणांनी तलाठी मंडल अधिकारी व पथकावर दगडफेक सुरू केली. या दगडफेकी दरम्यान चारही ट्रॅक्टर पळवून नेण्यात ट्रॅक्टरचालक यशस्वी झाले. या घटनेची पाटील यांनी जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांना माहिती दिली. दरम्यान या घटनेची माहिती तहसिलदार चंद्रजित राजपूत यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगविले. तसेच एक ट्रॅक्टर ताब्यात घेतला. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.जिल्हाधिकाºयांकडून दखलअवैधरित्या गौणखनिज वाहतूक करणाºयांची मुजोरी तालुक्यात वाढली आहे. बिनदिक्कतपणे उपसा केला जात आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांच्या पथकावर दगडफेक करण्याइतपत मुजोरी वाढली आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकारी मांढरे यांनी गंभीर दखल घेतली असून कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
खनिजकर्म अधिकाऱ्यांच्या पथकावर मालेगावी दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:17 AM
गौण खनिज खदानी व खडीक्रशर यंत्राची तपासणी करण्यासाठी आलेल्या जिल्हा खनिजकर्म अधिकारी आनंद पाटील यांच्या पथकावर अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याचा प्रकार सायने शिवारात घडला. गौणखनिज वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर दगडफेक करणाऱ्यांनी पळवून नेले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
ठळक मुद्देसायने शिवारातील घटना : संशयितांनी चार ट्रॅक्टरही पळविले