सायखेडा : करंजगाव येथील संस्कार निकेतन पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी महाशिवरात्रीनिमित्त मल्लखांबाची प्रत्यक्षिके सादर केली. येथील प्रभाकर पवार यांनी आपल्या मालकीच्या चार एकर जागेत वद्यक पद्धतीने शिक्षण देणारी पाठशाळा सुरू केली. याठिकाणी गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान तसेच महाराष्ट्रातील ७३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केवळ पुस्तकी शिक्षण न देता जीविकेचे शिक्षण देणारी एक माणूस घडविणारी शिक्षण संस्था म्हणून कार्य करत आहे. संस्थेतर्फे महाशिवरात्रीनिमित्त गावात मल्ल खांब खेळाचे विविध प्रात्यिक्षके सादर करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आमदार अनिल कदम यांच्यासह रेल्वे कमिशनर रामभाऊ पवार, विष्णू पवार, प्रभाकर पवार, सरपंच शहाजी राजोळे, उपसरपंच श्रावण गांगुर्डे, माजी सरपंच खंडू बोडके पाटील, राधू भगुरे, भरत पगार आदी उपस्थित होते.
करंजगाव येथे संस्कार निकेतनतर्फे मल्लखांब प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:10 PM