मालेगाव : येथील पवारवाडी भागात राहणाºया महमद अस्लम (३६) या तरुणाचा सुपारी देऊन खून करणाºया महमद हासीम याला येथील अपर जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील तिघा संशयितांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.१३ सप्टेंबर २०१४ रोजी हा खुनाचा प्रकार मुंबई-आग्रा महामार्गावर पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. महंमद हासीम महंमद शमी व महंमद अस्लम यांच्यात वाद झाला होता. अस्लम याने हासीमच्या विरोधात अब्रूनुकसानीचा गुन्हा दाखल केला होता. याचा राग येऊन महंमद अस्लमला पार्टीचे निमंत्रण देऊन चाळीसगाव फाटा परिसरात बोलविले होते. याठिकाणी शमशाद हुसेन, शेख तौफीक शेख सुलेमान, अफजल हुसेन जहीद हुसेन यांना अस्लमला ठार मारण्याची सुपारी दिली होती. चाळीसगाव फाट्यावरील निवांत ठिकाणी महंमद अस्लम याचा खून करण्यात आला. या प्रकरणी महंमद इर्शाद यांच्या फिर्यादीवरून पवारवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरच्या खून खटल्याचे कामकाज येथील अपर सत्र न्यायालयात सुरू होते. या खटल्यात नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे बळवंत शेवाळे यांनी काम पाहिले.
सुपारी देऊन तरुणाचा खून करणाऱ्याला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 5:48 PM