नाशिक : वातानुकूलित सभागृहात भव्य व्यासपीठ, चहुबाजूंनी सुगंधी फुलांची सजावट, प्रमुख नेत्यांना बसण्यासाठी गुबगुबीत सोफा, व्यासपीठाच्या पार्श्वभागी अत्याधुनिक डिजिटल फलक, समोर बसलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठीही आरामदायी व्यवस्था, दोन हजार पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना शुद्ध पाण्याबरोबरच स्नॅक्सचा आस्वाद घेण्याची सोय... अशाप्रकारे तक्रारीला जागा न ठेवणाऱ्या नाशकातील युतीच्या मनोमीलन मेळाव्याचा खर्च मात्र कोण भागविणार, यावरून आता सेना व भाजपात तंटा उभा राहिला आहे.सेना-भाजपाच्या युतीनंतर दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एकत्रितपणाचा संदेश जावा, या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी राज्यात विभागीय मेळाव्यांचे आयोजन केले असून, नाशिक विभागाचा मेळावा नाशिक येथे गेल्या रविवारी (दि.१७) पार पडला. यासाठी उत्तर महाराष्टÑातील सेना-भाजपाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी अशा सुमारे सोळाशे निमंत्रितांना प्रवेश देण्याचे ठरले असले तरी, नेत्यामागे कार्यकर्ते येणारच म्हणजेच दोन हजारांहून अधिक कार्यकर्ते येण्याची शक्यता गृहीत धरून आयोजन करण्यात आले होते. सेनेच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर वरिष्ठ नेतृत्वाचा अतिविश्वास असल्याने उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांतच मेळाव्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्याने सेनेने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत मेळावा पार पाडला. त्यासाठी वातानुकूलित हॉल ठरविण्यात येऊन आवारात प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय मंडप उभारून त्याची नोंद घेण्याची व्यवस्था ठेवण्यात आली होती. होणारी गर्दी अपेक्षित धरून हॉलबाहेरही डिजिटल फलकाद्वारे थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आलेली होती. उत्तर महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून कार्यकर्ते येणार म्हटल्यावर त्यांच्या नास्त्याची व शुद्ध पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली होती.शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात झालेल्या या मेळाव्याचा खर्च शिवसेनेने करावा, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे तर मेळावा उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा असल्याने आणि त्यातही आठपैकी सहा खासदार भाजपाचेच आहेत, त्यामुळे भाजपानेच या खर्चाचा अधिक भार उचलावा अशी भूमिका सेनेने घेतली आहे. शिवाय नाशिक जिल्ह्यात एक जागा भाजपाची असल्याने त्याचाही दाखला सेनेने दिला आहे.खासदारांनी झटकले हातमनोमीलन मेळाव्यासाठी झालेल्या लाखो रुपये खर्चाचा भार कोणी उचलायचा यावरून दोन्ही पक्षांच्या प्रमुखांकडून एकमेकांकडे अंगुलीनिर्देश केले जात असताना, या वादातून दोन्ही पक्षांच्या विद्यमान खासदारांनीही अंग काढून घेतले आहे. युतीच्या मनोमीलनासाठी हा मेळावा होता, त्यात खासदारांना अद्याप पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे खासदारांवर हा भार कसा टाकता येईल, असा सवाल त्यांच्याकडून केला जात आहे. तर इच्छुकांच्या मते पक्षाने अद्याप स्पष्ट संकेत दिलेले नसल्यामुळे विनाकारण खर्च का उचलावा, असेही त्यांचे म्हणणे आहे.मेळाव्यानिमित्त शहरात जवळपास २५ ठिकाणी फलक लावण्यात येऊन त्याची जाहिरातबाजीही करण्यात आली होती. निवडणूक यंत्रणेनेही या मेळाव्याच्या ठिकाणी चार भरारी पथकांची नेमणूक करून एकूणच बारीकसारीक गोेष्टींची दखल घेत, झालेल्या खर्चाचा अंदाज बांधला आणि मेळाव्यावर किमान पन्नास लाखांहून अधिक रक्कम खर्ची पडल्याचे सांगण्यात आले. आता या मेळाव्यावर झालेल्या खर्चावरून युतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये तंटा उभा राहिला आहे.
‘मनोमीलनाच्या’ खर्चावरून युतीत ‘तंटा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 1:43 AM
वातानुकूलित सभागृहात भव्य व्यासपीठ, चहुबाजूंनी सुगंधी फुलांची सजावट, प्रमुख नेत्यांना बसण्यासाठी गुबगुबीत सोफा, व्यासपीठाच्या पार्श्वभागी अत्याधुनिक डिजिटल फलक, समोर बसलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठीही आरामदायी व्यवस्था, दोन हजार पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना शुद्ध पाण्याबरोबरच स्नॅक्सचा आस्वाद घेण्याची सोय... अशाप्रकारे तक्रारीला जागा न ठेवणाऱ्या नाशकातील युतीच्या मनोमीलन मेळाव्याचा खर्च मात्र कोण भागविणार, यावरून आता सेना व भाजपात तंटा उभा राहिला आहे.
ठळक मुद्देभाजपाने जबाबदारी झटकली : सेनेचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार