मनमाड : पाणीटंचाई पाचवीला पूजलेल्या मनमाड शहरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून अवैध पाणीचोरी होत असल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. याबाबत पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांनी तीन जणांविरु द्ध पोलिसांत तक्र ार अर्ज दाखल केला आहे.शहरासाठी पालखेडचे पाण्याचे आवर्तन उशिरा मिळाल्याने शहारात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वीस ते बावीस दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे महिला हंडाभर पाण्यासाठी भटकंती करीत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना थेट पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून पाण्याची चोरी होत असल्याचे उघड झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहराच्या नगरचौकी भागाला पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह खोलून थेट शेतात पाणी साठवून ठेवणाºया सुनील खाडे, दिलीप खाडे, रमेश खाडे या तिघांच्या विरोधात मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांनी पोलीस ठाण्यात तक्र ार अर्ज दाखल केला आहे. शहरात निर्माण झालेली पाणीटंचाई पाहता पालखेड येथून तब्बल ८४ किमी अंतरावरून मनमाड शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी आणले जात असताना शेतीसाठी पाणी चोरी करणे ही बाब गंभीर असल्याचे तक्र ार अर्जात म्हटले आहे.
मुख्य जलवाहिनीतून मनमाडला पाणीचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 12:49 AM
: पाणीटंचाई पाचवीला पूजलेल्या मनमाड शहरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून अवैध पाणीचोरी होत असल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. याबाबत पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांनी तीन जणांविरु द्ध पोलिसांत तक्र ार अर्ज दाखल केला आहे.
ठळक मुद्देतीन जणांविरु द्ध पोलिसांत तक्र ार