पाथरे येथील राजकीय वातावरण हे कोपरगाव आणि सिन्नर तालुक्यांतील राजकीय बदलास महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यामुळे पाथरे खुर्द, पाथरे बुद्रुक, वारेगाव, कोळगावमाळ येथील ग्रामपंचायतींवर आपला झेंडा राहिला पाहिजे, यासाठी दोन्ही तालुक्यांतील नेत्यांसह स्थानिक पातळीवरील नेत्यांची इच्छा असते. सरपंचपदासाठी मंदाबाई दवंगे आणि मीना घोलप, तर उपसरपंचपदासाठी प्रदीप पाटील आणि सुवर्णा दवंगे यांनी नामनिर्देशनपत्र भरले होते. गुुप्त मतदान पद्धतीने निवड प्रक्रिया पार पडली. मंदाबाई दवंगे आणि प्रदीप पाटील यांना अनुक्रमे प्रत्येकी चार मते मिळाली, तर मीना घोलप आणि सुवर्णा दवंगे यांना प्रत्येकी तीन मते मिळाली. यावेळी रश्मी चिने, कल्याबाई जाधव, गीता सगर या सदस्यांनी निवड प्रक्रियेत सहभाग घेतला. निवडणूक अधिकाऱ्यांनी सरपंच मंदाबाई दवंगे व उपसरपंच प्रदीप पाटील यांची निवड झाल्याची घोषणा केली. त्यांना ग्रामसेवक नितीन मेहेरखांब यांनी मदत केली. संगणक कर्मचारी शरद गव्हाणे, कर्मचारी पांडुरंग चिने यावेळी उपस्थित होते. निवडीनंतर समर्थक ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी केली. गुलालाची उधळण करत नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी ग्रामस्थ, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
280221\28nsk_18_28022021_13.jpg
===Caption===
वारेगावच्या सरपंचपदी मंदाबाई दवंगे तर उपसरपंचपदी प्रदीप पाटील यांचा सत्कार करताना समर्थक व ग्रामस्थ.