उपनगर : गांधीनगर येथील भारत सरकार मुद्रणालयातील कामगार पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुकीत संजय डोंगरे यांच्या पॅनलने सर्व जागांवर विजय मिळविला आहे.गांधीनगर येथील मुद्रणालय कामगार पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत डोंगरे यांच्या पॅनलने सर्व १५ जागांवर विजय मिळवून सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. नुकत्याच झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष- संजय डोंगरे, उपाध्यक्ष संजय गंगातीरकर, सचिव आरीफ शेख, सहसचिव प्रशांत भराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित संचालकांचा प्रेस कामगार युनियनचे सरचिटणीस विजय वाघले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनोहर बोराडे, माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे, संजय घुगे, शशी जाधव, सुनील पवार, रवि आवारकर, राजेंद्र चौधरी, अजित शेजवळ, देवेंद्र पगारे, रमेश मकवाना, भरत भोगले, रामकृष्ण शिरोळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
मुद्रणालयातील कामगार पतसंस्थेवर डोंगरे पॅनलचे वर्चस्व
By admin | Published: December 29, 2015 12:18 AM