नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील धुळवाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंदाबाई विष्णू आव्हाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.येथील ग्रामपंचायतीवर आमदार राजाभाऊ वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या गटाची सत्ता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डी.बी. सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदस्यांच्या विशेष बैठकीत निवड करण्यात आली. मावळते सरपंच इंदूबाई भाऊसाहेब आव्हाड यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून आवर्तन पद्धतीने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी आव्हाड यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सोनवणे यांनी आव्हाड यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. याप्रसंगी उपसरपंच प्रकाश नथुजी आव्हाड, गणपत केरू सांगळे, द्रौपदाबाई पोपट जेडगुले, लता अर्जुन मेंगाळ, लक्ष्मीबाई धोडिंबा गोफणे, ग्रामसेवक एस.ए. पाटोळे, कामगार तलाठी मनोज नवाळे उपस्थित होते. याप्रसंगी बाळासाहेब सांगळे, विष्णू आव्हाड, निवृत्ती आव्हाड, अर्जुन आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, भाऊसाहेब सांगळे, सुभाष आव्हाड, बाबूराव आव्हाड, निवृत्ती ढाकणे, एकनाथ आव्हाड, मधुकर आव्हाड, दादाहरी सांगळे, गणपत बुरकुल, शंकर जेडगुले, गंगाराम मेंगाळ आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच मंदाबाई आव्हाड यांचा आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
धुळवाड सरपंचपदी मंदाबाई आव्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:43 AM
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील धुळवाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंदाबाई विष्णू आव्हाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. येथील ग्रामपंचायतीवर आमदार राजाभाऊ वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या गटाची सत्ता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डी.बी. सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदस्यांच्या विशेष बैठकीत निवड करण्यात आली.
ठळक मुद्देसर्वानुमते बिनविरोध निवड आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते सत्कार