नाशिक : मंदार वैद्य यांना नुकतेच आॅर्डर आॅफ आॅस्ट्रेलिया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आॅस्ट्रेलियन नागरिकांनी समाजासाठी विविध क्षेत्रांत बहुमूल्य योगदान दिले आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो.मंदार वैद्य यांनी नाट्यकौशल्य, दृढनिश्चय यांच्या बळावर नाट्य आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मंदार वैद्य हे बालवयापासून सांस्कृतिक कार्यक्र मात हिरीरीने भाग घेत असत. त्याचा संस्कार मंदार यांच्यावर झाला. पुढील उच्चशिक्षण घेत असताना त्यांनी विद्यापीठात विविध नाटकांत भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांनी नाटकांची निर्मिती केली. त्यांना अभिनय, दिग्दर्शन, नृत्य दिग्दर्शन, निर्माता अशा नाट्यकलेच्या विविध क्षेत्रांत मुशाफिरी करायची संधी मिळाली. त्यांनी समविचारी मित्रांना सोबत घेऊन कलाविष्कार या संस्थेची स्थापना केली. तसेच त्यांनी नाट्यदर्पण या नावाजलेल्या थिएटर अकॅडमीची स्थापना केली. मंदार वैद्य यांनी नाटकाचा निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता व समन्वयक या नात्याने नाटके, नाट्य कार्यशाळा, एकपात्री प्रयोग उत्सव सादर केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी सामाजिक भानदेखील जपले आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी गूड फ्रायडे अपीलद्वारे सुमारे २० हजार डॉलर निधी उभा केला आहे.
मंदार वैद्य यांना आॅर्डर आॅफ आॅस्ट्रेलिया पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:29 AM