नाशिक : समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास नकार देणाºया सिन्नर तालुक्यातील शिवडे ग्रामस्थांशी बुधवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकºयांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याने शिवडे ग्रामस्थांनीही महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्याबाबत लवकरच गावकºयांशी चर्चा करून निर्णय कळविण्याचे आश्वासन दिले. सुमारे दीड तास चालललेल्या या बैठकीत दोन्ही बाजूंनी सकारात्मकता दर्शविण्यात आल्याने यासंदर्भातील तिढा सुटण्याची शक्यता बळावली आहे.मुंबई-नागपूर महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध दर्शवून शिवडे येथील शेतकºयांनी जमिनीची मोजणी करू देण्यासही नकार दिल्यामुळे कामात अडथळा निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे व त्यात अडचणी येत असल्यामुळे प्रशासनातील अधिकाºयांनी अनेक मार्गाने शिवडे ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश मिळत नव्हते. या सर्व पार्श्वभूमीवर सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी मध्यस्थी करून शिवडे ग्रामस्थ व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी बुधवारी दुपारी शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. यावेळी शिवडे ग्रामस्थांनी शिंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. विकासाला आमचा विरोध नाही, परंतु समृद्धीसाठी जमिनी गेल्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. या महामार्गात विहिरीही नष्ट होणार असून, त्यामुळे पंचक्रोशीत पाण्याची समस्या निर्माण होऊन शेतकरी उद्ध्वस्त होतील, अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यावर शिंदे यांनी, शेतकºयांच्या अनुमतीशिवाय सरकार कोणाचीही जमीन घेणार नाही, परंतु ज्या-ज्या भागातून समृद्धी महामार्ग जाईल तेथील शेतकरी समृद्ध होतील, असे सांगितले. शेतकºयांच्या काही मागण्या योग्य असून, सरकार सकारात्मकतेने त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेल व काही मागण्यांबाबत उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत चर्चा करून मार्ग काढण्यात येणार असल्याचे सांगितले.सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याने सरकार याप्रश्नी शेतकºयांना दिलासा देणार असेल तर लवकरच शिवडे गावात बैठक घेऊन संपूर्ण गावकºयांसमोर हा प्रस्ताव ठेवण्यात येईल व त्यांनी अनुमती दिल्यास जागा मोजणीचा निर्णय अधिकाºयांना कळविण्यात येईल, असे आश्वासनही ग्रामस्थांकरवी देण्यात आले. या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन आदी उपस्थित होते.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, विठ्ठल सोनवणे यांच्यासह प्रकल्पबाधित सोमनाथ वाघ, विष्णू हरक, हरिभाऊ शेळके, संजय हरक, शरद हरक, परशराम हरक, नंदू शेळके, रमेश शेळके, संजय चव्हाणके, बाजीराव हरक आदी शेतकरी उपस्थित होते. समृद्धीला सेनेचा विरोध नाहीया बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा कधीही विरोध नव्हता, असा यू टर्न घेतला. शिवसेनेच्या नाशिक मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना समृद्धीबाधित शेतकºयांच्या पाठीशी उभी राहील अशी घोषणा केली होती, त्याची आठवण शिंदे यांना करून देण्यात आल्यावर ते म्हणाले, शिवसेनेने विकासाला कधीच विरोध केला नाही. शेतकºयांचा विरोध असेल तर शिवसेना विरोध करेल अशी आमची भूमिका होती. आता शेतकरी स्वखुशीने जागा देण्यास संमती देत असल्यामुळे विरोधाचा प्रश्नच निर्माण होत नाही. उलट आपण स्वत: प्रत्येक शेतकºयाला भेटून त्यांची भूमिका समजून घेत असून, शेतकºयांना चांगला मोबदला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवडेकरांच्या मागण्या समितीपुढे मांडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:36 AM
नाशिक : समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास नकार देणाºया सिन्नर तालुक्यातील शिवडे ग्रामस्थांशी बुधवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकºयांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याने शिवडे ग्रामस्थांनीही महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्याबाबत लवकरच गावकºयांशी चर्चा करून निर्णय कळविण्याचे आश्वासन दिले. सुमारे दीड तास चालललेल्या या बैठकीत दोन्ही बाजूंनी सकारात्मकता दर्शविण्यात आल्याने यासंदर्भातील तिढा सुटण्याची शक्यता बळावली आहे.
ठळक मुद्देएकनाथ शिंदे : ‘समृद्धी’ला विरोध मावळल्याची चिन्हे; जमिनीच्या मोजणीबाबत निर्णय कळविणार