वडनेर : काटवन परिसरात आंब्याला मोहर फुटण्यास सुरूवात झाली आहे. थंडी आंब्यासाठी पोषक समजली जाते. या परिसरात पाटकिनारी शेकडो आंब्याची झाडे आहेत. गावरान आंब्याची भली मोठी झाडे असल्याने वडनेर सह परिसरात कायमच ग्रामस्थांना गावरान आंब्याची चव चाखायला मिळत असते.गेल्या काही वर्षापासून अवकाळी व दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आंबा पिकावर परिणाम दिसून येत होता यामुळे गावरान आंब्याचे उत्पादनावर त्याचा परिणाम होत होता. यंदा सुरु वातीपासूनच चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वत्र हिरवळ असले आहे. सर्वच झाडांवर नवी पालवी फुटली असून आंब्याच्या झाडाला नवीन मोहर फुटताना दिसून येत आहे. यामुळे यावर्षी गावरान आंब्याची प्रमाण उत्पादन काही प्रमाणात वाढेल अशी आशा आहे. तालुक्यात काही ठिकाणी गावरान आंब्याचे झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आली असली तरी वडनेरच्या पाटकिनारी गावरान आंब्याची झाडे चांगल्या स्थितीत आहेत.
काटवन परिसरात आंब्याला मोहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 6:20 PM