लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जगभर उठलेली कोरोना विषाणूची टोळधाड, मृत्यूने घातलेले थैमान आणि रोज संशयित-बाधितांचा सुरू असलेला लपंडाव यामुळे निर्माण झालेला नकारात्मक भाव नष्ट व्हावा व एक सकारात्मक ऊर्जा तयार होऊन आशेचे दीप मनामनात प्रज्वलित व्हावे, याकरिता रविवारी (दि. ५) रात्री ९ वाजेनंतर ९ मिनिटे अनोखा दीपोत्सव घराघरात साजरा झाला. सोशल डिस्टन्स ठेवून सोशल कनेक्ट करणारा, सर्वांचे मनोबल उंचावणाऱ्या या दीपोत्सवाने कोरोनाविरु द्धच्या लढाईत ‘हम सब साथ साथ है’ हा विश्वास अधिक दृढ केला.भारतातही कोरोनाविरुद्धची लढाई तीव्र होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमाम भारतीयांचे मनोबल उंचावण्यासाठी आधी २२ मार्चला जनता कर्फ्यूनंतर लोकांना थाळीनाद आणि टाळ्या वाजविण्याचे आवाहन केले होते. त्याला देशभर उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर लॉकडाउनची घोषणा झाली होती. आता लॉकडाउनचा १२ दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर लोकांमध्ये कोरोनाविषयी असलेला भीतीचा प्रकोप दूर व्हावा आणि त्यांनी कोरोना विरु द्धच्या लढाईत सरकारी प्रयत्नाना धैर्याने साथ द्यावी यासाठी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लोकांना आपापल्या गॅलरीत, घराच्या उंबºयावर दिवे पेटविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहर व जिल्ह्यात हा अनोखा दीपोत्सव नागरिकांनी अनुभवला. कोरोनाच्या भयाची किनार लाभलेल्या या दीपोत्सवाने मनामनात ही लढाई जिंकण्याची ऊर्जा दिली. थाळी आणि टाळी वादनाप्रमाणेच लोकांनी आपल्या घरातील बाल्कनीत, गच्चीवर, उंबरºयावर हाती पणत्या, मेणबत्त्या पेटवत जगण्याच्या लढाईत स्वबळ आणखी वाढवले. लोकांनी ही लढाई लाईटली न घेता रात्री ९ वाजता घरातील विजेचे दिवे मालवले आणि तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणारा प्रकाशाचा उत्सव साजरा केला.या लढाईत आपण एकटे नाही तर सर्व देश माझ्या सोबत आहे, हा एक दृढ भावही यामुळे लोकांमध्ये घट्टपणे रु जला.मालेगावकरांनी घराघरात लावले दिवे मालेगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार शहरातील नागरिकांनी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सुमारे नऊ मिनिटे घरातील विजेचे दिवे बंद करुन मेणबत्ती, पणत्या आणि मोबाईल टॉर्चद्वारे दिवे लावल्याने संपूर्ण अंधारात दिव्यांच्या प्रकाशामुळे शहर उजळून निघाले. सटाणानाका, लोढाभुवन, बारा बंगला, कॅम्प, चर्चपरिसर मामलेदार गल्ली, शास्त्रीचौक भागासह शहरात दहा मिनिटांसाठी नागरिकांनी आपापल्या घरातील विजेचे दिवे बंद केले. हातात लहान मुलांसह महिला वर्गही मोबाईल टॉर्च, पणत्या, मेणबत्या पेटवून हातात धरल्या होत्या. यावेळी मात्र कुणीही घराबाहेर पडले नाही. केवळ आपापल्या घरातील व्हरांडा, बाल्कनी आणि घराघरात काही काळासाठी अंधार झाला होता. रस्त्यांवरील शुकशुकाटात घराघरात लखलखणाºया पणत्या मेणबत्या आणि मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात शहर ‘न्हावून’ निघाले.
मनाम्हम सब साथ साथ है.. :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 9:35 PM
नाशिक : जगभर उठलेली कोरोना विषाणूची टोळधाड, मृत्यूने घातलेले थैमान आणि रोज संशयित-बाधितांचा सुरू असलेला लपंडाव यामुळे निर्माण झालेला नकारात्मक भाव नष्ट व्हावा व एक सकारात्मक ऊर्जा तयार होऊन आशेचे दीप मनामनात प्रज्वलित व्हावे, याकरिता रविवारी (दि. ५) रात्री ९ वाजेनंतर ९ मिनिटे अनोखा दीपोत्सव घराघरात साजरा झाला. सोशल डिस्टन्स ठेवून सोशल कनेक्ट करणारा, सर्वांचे मनोबल उंचावणाऱ्या या दीपोत्सवाने कोरोनाविरु द्धच्या लढाईत ‘हम सब साथ साथ है’ हा विश्वास अधिक दृढ केला.
ठळक मुद्देकोरोनामुक्तीच्या लढाईत उजळून निघाला निर्धारानात पेटले आशेचे दीप !