शैलेश कर्पेसिन्नर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आणि रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगिरथ शिंदे यांनी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना लोकसभेची निवडणूक लढविण्याचे आवताण जाहीर सभेत दिल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाशिकच्या जागेवर मित्रपक्ष शिवसेनेचे स्टँडिंग खासदार असले तरी मित्रपक्ष शिवसेनेसोबत तडजोड होऊन राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे लोकसभेचे उमेदवार होऊ शकतात, असा दावाही ॲड. भगिरथ शिंदे यांनी केल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.सिन्नर तालुक्यातील वावी येथे ग्रामपंचायतीने बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या लोकार्पणप्रसंगी आयोजित जाहीर सभेत ॲड. भगिरथ शिंदे बोलत होते. सहकारातील तज्ज्ञ आणि अभ्यासक असणाऱ्या तसेच शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसोबत उठबस असलेल्या ॲड. शिंदे यांनी ऐन महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेच्या जागेच्या तडजोडीबाबत वक्तव्य केल्याने शिवसेना काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.भाजपा-सेनेची युती असताना हेविवेट नेते छगन भुजबळांसह राष्ट्रवादीला सलग दोन लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत करून लोकसभेची जागा सलग दुसऱ्यांदा जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा ठोकल्याने महाविकास आघाडीत शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागणे स्वाभाविक आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही आमदार माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. त्यावेळी त्यांना पराभूत व्हावे लागले होते. मात्र, आता त्याची कसर भरून काढण्यासाठी ॲड. शिंदे यांनी आमदार कोकाटे यांची पाठराखण करण्यास सुरुवात केल्याचे महाआघाडीत तडजोड होते की राजकीय उष्मा वाढतो हे पाहणे तितकेच रंजक ठरणार आहे.खासदार-आमदार निधीची तुलनाॲड. भगिरथ शिंदे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांनी खासदारकीची तयारी करण्याची अप्रत्यक्ष सूचना केल्यानंतर कोकाटे यांनी आपल्या भाषणात खासदार आणि आमदार यांना शासनाकडून दरवर्षी मिळणाऱ्या निधीबाबत तुलना केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे आमदारांना आता दरवर्षी एक कोटीचा निधी मिळतो आणि पाच वर्षांत पाच कोटी मिळतात, असे सांगण्यात आले. खासदाराला सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असूनही पाच कोटींचा निधी मिळतो, असे सांगून दोघांचा निधी सारखाच असल्याचे सांगितले.
लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून माणिकरावांची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 11:14 PM
शैलेश कर्पे सिन्नर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आणि रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. ...
ठळक मुद्देशिवसेनेच्या भूमिकेकडे नजरा : भगिरथ शिंदेंचे जाहीर सभेत आवतण