कोकाटे गटाचे वर्चस्व : उपसरपंचपदी भाऊसाहेब सांगळे विजयी
सिन्नर : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या नायगावच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीत चुरशीच्या निवडणुकीत सरपंचपदी मनीषा समाधान कदम व उपसरपंचपदी भाऊसाहेब खंडेराव सांगळे यांनी विजय मिळविला.
नायगाव ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे, पालकमंत्री छगन भुजबळ , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या समर्थकांचे आपला पॅनल व विरोधी गटाच्या ग्रामविकास पॅनलमध्ये झालेल्या रंगतदार लढतीत आपला पॅनलने १३ पैकी आठ जागा मिळवत आघाडी घेतली होती. सरपंचपदासाठी आपला पॅनलकडून मनीषा समाधान कदम, तर ग्रामविकास पॅनलकडून सुनीता शंकर पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर उपसरपंचपदासाठी आपला पॅनलचे भाऊसाहेब खंडेराव सांगळे यांना ग्रामविकास पॅनलच्या उत्तम दत्तात्रेय पाबळे यांनी आव्हान दिले. चारही उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर माघारीसाठी दिलेल्या मुदतीत कोणाही उमेदवाराने माघार न घेतल्याने सरळ लढत झाली. यात आपला पॅनलच्या मनीषा कदम (८) यांनी सुनीता पवार (५) यांचा पराभव करून सरपंचपदाला, तर भाऊसाहेब सांगळे (८) यांनी ग्रामविकासच्या उत्तम पाबळे (५) यांचा पराभव करून उपसरपंचपदाला गवसणी घातली. निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच मनीषा कदम व उपसरपंच भाऊसाहेब सांगळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पॅनलचे नेते भाऊसाहेब लोहकरे, विष्णू पाबळे, अंबादास जेजूरकर, किरण घिया, राजेंद्र बैरागी, एकनाथ जारकड, सलीम शेख, अशोक लोहकरे, संतोष सहाणे आदींसह नवनिर्वाचित सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
----------
नायगावच्या सरपंचपदी मनीषा कदम, तर उपसरपंचपदी भाऊसाहेब सांगळे विजयी झाले. त्यांच्या सत्कारप्रसंगी भाऊसाहेब लोहकरे, राजेंद्र बैरागी, विष्णू पाबळे, दिलीप लोहकरे, अशोक लोहकरे, संजय सांगळे, पुरुषोत्तम सौदाणे आदी. (०४ नायगाव)
===Photopath===
040321\04nsk_20_04032021_13.jpg
===Caption===
०४ नायगाव