मनमाड (नाशिक) : मनमाड नांदगाव रोडवरी नागापूर व पानेवाडी शिवारात असलेल्या इंधन प्रकल्पातून इंधन भरून निघालेले टँकर रस्त्यावर उभे करण्याच्या वादातून टँकरच्या काचा फोडण्यात आल्या. चालकाला मारहाण केल्याचा आरोप तीन तेल कंपन्या व गॅस बॉटलींग परकल्पातील इंधन वाहतूकदार व चालकांनी इंधन वाहतूक न करण्याचा निर्णय घेतल्याने उत्तर महाराष्ट्र , मराठवाडयासह अनेक जिल्ह्याचा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे.
जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आल्याने तिढा वाढला आहे. दोन दिवसांपासून इंडियन ऑईल कंपनीत चालकांनी संप केला होता.त्यातून रस्त्यावर गाड्या उभ्या केल्यामुळे अपघात होत असल्याचा स्थानिक ग्रामपंचयातीचा आरोप होता. त्यातून रविवारी रात्री अज्ञात इसमांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या होत्या. त्यामुळे इंधन वाहतूकदार व चालकांमध्ये संताप आहे.