मनमाड महाविद्यालयाचा वर्धापन दिन साजरा मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थे चा ६८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.या निमित्ताने आॅनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे स्कीपिंग ( दोरीवरच्या उड्या) हा खेळ प्रकार 'फिट रहेगा इंडिया' या मोहिमेअंतर्गत सादर करण्यात आला .या व्याख्यानमालेचे उद्घाटन संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी निवृत्त उपजिल्हाधिकारी देविदास चौधरी यांनी 'राष्ट्रीय सेवा योजना आणि गांधी विचार' या विषयावर गुंफले. त्या पुढील पुष्प अनुक्रमे माजी विद्यार्थी प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे (महात्मा गांधीजींचे शैक्षणिक मूल्यवर्धक विचार),विजय तांबे (चौथी औद्योगिक क्रांती ), माणिक तुकाराम शेडगे (ग्रामीण शिक्षण आणि गांधीजी), प्राचार्य भाऊसाहेब गमे (गांधी विचार), डॉ. नंदकिशोर पालवे (राष्ट्रपिता महात्मा गांधी : एक युगमुद्रा), मुकुंद बाळकृष्ण दीक्षित (२१ व्या शतकात गांधीजींची प्रासंगिकता), श्रीकांत नावरेकर (कोरोना च्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींच्या विचारांची मौलिकता) व समारोप पुष्प महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही.एस. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगरच्या स्नेहालयचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांनी गुंफले.प्राचार्य डॉ. बी .एस.जगदाळे यांच्या हस्ते वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे स्कीपिंग ( दोरीवरच्या उड्या) हा खेळ प्रकार 'फिट रहेगा इंडिया' या मोहिमेअंतर्गत घेण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, वरिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ बी एस देसले, कनिष्ठ विभागाच्या पर्यवेक्षिका प्रा. ज्योती पालवे , सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले.
मनमाड : आॅनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 4:24 PM
मनमाड महाविद्यालयाचा वर्धापन दिन साजरा मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर ...
ठळक मुद्देमनमाड महाविद्यालयाचा वर्धापन दिन साजरा मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थे चा ६८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.या निमित्ताने आॅनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले