मनमाड : येथे सोमवारी पुन्हा कोरोनाचे दोन रु ग्ण आढळून आल्यानंतरशहरातील भाजीबाजार चार दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आनंदवाडी भागानंतर आता रु ग्ण आढळून आल्या आययुडीपी हा भाग कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या भागात बॅरिकेटिंग लावून रस्ते बंद करण्याची कार्यवाही पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच संबंधित भागात पालिकेतर्फे जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे . १४ मे पर्यंत भाजी व फळ बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून अत्यावश्यक सेवा किराणा, बेकरी, शेती अवजारे विक्र ी सध्याप्रमाणेच म्हणजे दररोज सकाळी १० ते सायं ४ पर्यंत सुरू राहणार आहे. दवाखाने, मेडिकल दररोज पूर्णवेळ सुरू राहणार आहे. आययुडीपी व आनंदवाडी हे भाग कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले असून तेथे मुक्त संचाराला बंदी आहे. शहराच्या विविध भागात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने काही वेळेस गर्दी दिसून येत आहे. आज सकाळपासून विविध बँकांच्या आवारात भर उन्हात ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या . मनमाड शहरात कोरोना बाधित दोन रु ग्ण आढळून आल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिका प्रशासन सज्ज झाले असून प्रशासनाने या भागात भेट देऊन नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहे.
मनमाडला चार दिवस भाजीबाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 6:24 PM