ठळक मुद्दे रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रमाणामुळे वाहनचालकांना रहदारी करणे अडचणीचे
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक ते मुखेड या दोन ते अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.मागील काही वर्षांपासून या मानोरी बुद्रुक ते मुखेड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत होता. तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मानोरी बुद्रुक-मुखेड रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रमाणामुळे वाहनचालकांना रहदारी करणे अडचणीचे झाले होते. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या काटेरी झुडपांचे अतिक्रमणदेखील कमी झाल्याने मुखेड, मानोरी बुद्रुक, देशमाने, आदी परिसरातील नागरिकांसाठी हा मुख्य रस्ता असून, या रस्त्याला पुन्हा डांबरीकरणाची झळाळी मिळणार असल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.